आरक्षण लढ्यासाठी शनिवारी मंगळवेढा तालुक्यातील मराठा समाजाचे मुंबईकडे प्रस्थान. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १८ जानेवारी, २०२४

आरक्षण लढ्यासाठी शनिवारी मंगळवेढा तालुक्यातील मराठा समाजाचे मुंबईकडे प्रस्थान.



                        मंगळवेढा: मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणासाठी शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता मुंबई मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मंगळवेढ्यातून सकल मराठा समाजाचे शिवप्रेमी चौकातील शिवालयातून प्रस्थान होणार आहे.

                      प्रारंभी शिवमूर्तीचे पूजन होणार असुन पंढरपूर-टेंभुर्णी मार्गे मराठा समाज मुंबईकडे कुच करणार आहेत सहभागी होणाऱ्या बांधवांनी येताना आपल्या गाडीला भगवा ध्वज लावावा तसेच मोकळ्या वातावरणात टिकेल अशी जेवणाची शिदोरी बरोबर घ्यावी पहिला मुक्काम टेंभुर्णी  येथे होणार आहे.

                      तरी आपल्या लेकराबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बहुसंख्येने मराठा बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज‌ मंगळवेढा शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.



test banner