मंगळवेढा:जय जवान महिला मंडळ व ॲग्रीक्रॉस एक्सपोर्टस प्रा.लि.पुणे यांच्या वतीने उदया शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये वेशभूषा स्पर्धा राष्ट्रमाता जिजाऊंची वेशभूषा व लहान मुलांनी छत्रपती शिवराय व मावळ्यांची वेशभूषा करणे तसेच वक्तृत्व स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
विषय राष्ट्रमाता जिजाऊ सदर कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या सर्व महिलांना स्वराज्यमाता जिजाऊ हे पुस्तक भेट देण्यात येणार आहे.
सर्व कार्यक्रम जय जवान तरुण मंडळ दत्तू-गुंगे गल्ली मंगळवेढा येथे होणार आहेत तरी जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जय जवान महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.