भारतासह बांगलादेशमध्ये १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवसाच्या रुपात साजरा केला जातो. बांगलादेशमध्ये पाकिस्तानपासून अधिकृतपणे स्वतंत्र झाल्यानं या दिवसाला खूप विशेष महत्त्व आहे.
बांगलादेश विजय दिन बांगलादेश या दिवशी पाकिस्तान पासून स्वतंत्र झाला. बांगला मुक्ती वाहिनीला मदत करतांना भारताने १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. भारतात हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ ला सुरू होवून १६ डिसेंबर १९७१ ला संपले.
स्वतंत्र भारताच्या इतिहासातील 16 डिसेंबर 1971 हा दिवस एक वैभवशाली पान आहे. या दिवशी भारताने पाकिस्तावरील युद्धात निर्णायक विजय मिळला. पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती केली. भारतीय लष्करानं या युद्धात अभूतपूर्व पराक्रम गाजवला. या पराक्रमामुळे जगाचा नकाशाच बदलला. या घटनेला आज 52 वर्ष पूर्ण झाली आहेत.
पाकिस्तानची फाळणी :
'कोणत्याही देशाला आपल्या सीमेचे शत्रूपासून संरक्षण करायचं असतं. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पाकिस्तानचे दोन तुकडे आपल्या दोन बाजूला होते. त्या परिस्थ्तीमध्ये पाकिस्तानची फाळणी करुन देशाचं संरक्षण करणं हा उपाय आपल्या हाती होता. दहा दिवस हे पाकिस्तानचे फाळणी युद्ध झाले. अगदी कमी कालावधीमध्ये संपलेलं हे जगातील एकमेव युद्ध आहे. या युद्धामुळे देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या.
बांगलादेशच्या निर्मितीसाठी झालेल्या या युद्धाला आता 51 वर्ष पूर्ण झाली आहेत. या युद्धाचं महत्त्व आजही जाणवतं, असं शेकटकर यांनी सांगितलं. 'आज भारताला त्रास देण्यासाठी चीन आगळीक करत आहे. पाकिस्तानची फाळणी झाली नसती तर चीननं सर्व बाजूनं आपल्याला त्रास दिला असता.
या युद्धामुळे भारताची संरक्षण क्षेत्रातील कामगिरी तर अभिमानास्पद आहेच पण या सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताचा दबदबा वाढला. भारत हा असा एकमेव देश आहे ज्यांनी एका देशाची फाळणी करून त्यांना शांततेत एक नवीन ओळख निर्माण करून दिली. जो भूभाग भारताने त्या युद्धामध्ये जिंकला होता त्यांनी तो परत त्या देशांना केला हे फारच कमी युद्धामध्ये होते.
1971 सालच्या युद्धामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी उचललेल्या कठोर पावलांमुळेच त्याचे आज 52 वर्षानंतर देखील दुर्गामी परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला आपल्या संरक्षण क्षेत्रापुढे अनेक आव्हाने आहेत. पण, या सर्व आव्हानांना परतावून लावण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे हे निश्चित आहे. याची चुणूक म्हणून हे 1971 चे युद्ध विजय दिन म्हणून आपण साजरा करतो.
भारताचा दबदबा वाढला :
'भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आजही तणावपूर्ण आहेत. पण, आपला पाकिस्तानवर दबदबा कायम आहे. या युद्धामुळे आपली बांगलादेशची सीमा सुरक्षित झाली. जागतिक स्तरावर चांगली ओळख झाली. या युद्धानंतर भारताने अतिशय समंजसपणे दोन देशांना वेगळं केलं. युद्धानंतर भूभाग परत दिला हे फार क्वचित ठिकाणी होते,'
'आज आपण रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध पाहत आहोत. हे युद्ध देखील गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. या युद्धावर आजही तोडगा निघालेला नाही. भारतानं 1971 साली केलेलं युद्ध हे कमी कालावधीमध्ये उत्कृष्ट नियोजनाचा नमुना म्हणून पाहिले पाहिजे,' हेही महत्त्वाचे आहे.