मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे म्हणून रायगड वरती छत्रपती शिवरायांना जय जवान महिला मंडळाने घातले साकडे. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे म्हणून रायगड वरती छत्रपती शिवरायांना जय जवान महिला मंडळाने घातले साकडे.



                    मंगळवेढा:मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला सरसकटआरक्षण मिळावे म्हणून जय जवान महिला मंडळच्या वतीने रायगडावरती छत्रपती शिवरायांना साकडे घालण्यात आले.

                    अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात उपोषणे आंदोलने सुरू आहेत त्याच धर्तीवर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी जय जवान महिला मंडळाने रायगडवरती छत्रपती शिवरायांना साकडे घालण्यात आले.यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर एक मराठा लाख मराठा,एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा देण्यात आला.

                   यावेळी प्रत्येक महिलांनी डोक्यावरती फेटा व गळ्यात भगवे उपरणे घातले होते यावेळी 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळाले नाही तर मुंबईच्या आंदोलनात सर्व महिला सहभागी होणार असा निर्धार यावेळी करण्यात आला.

                  यावेळी मंडळाच्या विद्या गुंगे,विजया गुंगे,सुजाता कसगावडे,जस्मिन मुजावर,रुकसाना मुजावर,राजाबाई घुलेसंगीता देशमुख,सुनिता पाटील,दमयंती कसगावडे,फुलाताई कसगावडे,अनिता कसगावडे सुनीता पवार,राधिका कसगावडे,मेघा सरवळे सुनीता कसगावडे,नंदिनी आवताडे,दिपाली पवार,तेजस्वी पवार,अलका मुरडे,हिराबाई चव्हाण,साक्षी मोरे,सविता घाडगे,अनजुम मुजावर,उज्वला दत्तू,सोनाली दत्तू,सुरेखा दत्तू राजश्री दत्तू,भाग्यश्री दत्तू, मनीषा दत्तू,अर्चना उन्हाळे, वैष्णवी उन्हाळे, प्रतीक्षा दत्तू, सुवर्णा  दत्तू,शोभा दत्तू,नम्रता दत्तू,उज्ज्वला गणेशाकर,जयश्री दत्तू , सारिका दत्तू,रुक्मिणी वाकडे उपस्थित होत्या.



test banner