स्व.हरिश्चंद्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील डॉ.विठ्ठल जाधव यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
दरवर्षी प्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कामाची दखल घेऊन उल्लेखनीय काम करनाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रत्येक वर्षी देण्यात येतो.
यावर्षी सण २०२३ मध्ये राज्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या ६० मान्यवरांना रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी सोलापूर येथील निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती स्व. हरीचंद्र फाउंडेशन चे संस्थापक श्री.कृष्णात गायकवाड यांनी दिली.
डॉ.विठ्ठल जाधव यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल यावर्षीचा पुरस्कार जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ.जाधव हे पुढे बोलताना म्हणाले की मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आजपर्यंत मी केलेल्या कामाची पोहच पावती आहे व या पुरस्काराने मला आणखी नव्याने काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे.
त्यांनतर त्यांनी स्व.हरिचंद्र फाउंडेशन चे आभार मानले व त्यानंतर अश्याप्रकारे काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली.तसेच सिद्धेवाडी ग्रामस्थ,मित्रमंडळी व नातेवाईक यांनी त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा देऊन कौतुक केले.