श्री संत दामाजी महाविद्यालयात संघमित्रा लोकरे यांचा सेवापू्र्ती सत्कार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात संघमित्रा लोकरे यांचा सेवापू्र्ती सत्कार.                   मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात १९९४ पासून वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असलेल्या संघमित्रा हिरालाल लोकरे यांचा सेवापूर्तीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ एन बी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

                 तसेच पतसंस्थेच्या वतीने देखील सत्कार करून पाच हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला यावेळी प्राचार्य पवार म्हणाले लोकरे या ३० नोव्हेंबर २०२३ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या  असुन महाविद्यालयाच्या ॲाफीसमध्ये लोकरे यांनी २९ वर्षं अतिशय प्रामाणिक सेवा बजावलेली आहे.


             


                एक महिला असुन देखील पडेल ती जबाबदारी पार पाडली आहे त्यांची सेवा कायम आठवणीत राहील असे सांगून त्यांनी भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी संघमित्रा लोकरे म्हणाल्या कॅालेजमध्ये काम करताना एका कुटुंबांमध्ये काम करते आहे.

             असेच वाटले सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले यावेळी डॅा संजय शिवशरण,प्रा विनायक कलुबर्मे,प्रा शारदा खुणे प्रा सारीका काटे,श्री शंकर चव्हाण,श्री मिस्त्री पवार यांनी देखील लोकरे यांच्या कार्याचा आढावा मनोगतातून व्यक्त करून शुभेच्छा दिल्या सुरवातीस नुकतेच दिवंगत झालेले शिपाई भागवत खांडेकर यांना महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा डॉ संजय क्षीरसागर यांनी केले तर उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे यांनी आभार मानले.test banner