मंगळवेढा:मराठा आरक्षणाचे वातावरण आणखी एकदा तापले असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जाग आणण्यासाठी आजपासून महाराष्ट्रात साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन मराठा समाजाला केले होते.
त्यामध्ये मंगळवेढा शहरामध्ये साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांना माजी न्यायमूर्ती गायकवाड समितीचे सदस्य व शासनाचे शिष्टमंडळ भेटल्यानंतर पाटील यांनी शासनाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सदर कालावधीत शासनाने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे यासाठी मंगळवेढा येथे १ डिसेंबर पासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येकी तीन गावे व शहरातील एक गल्ली मराठा बांधव दामाजी चौक येथे उपोषणास बसले होते.
अशा पद्धतीने मंगळवेढ़ा तालुक्यातील तीन गावे व शहरातील एक गल्ली 24 डिसेंबर पर्यंत साखळी उपोषण करणार आहेत तरी जास्तीत जास्त सकल मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषणात सहभाग नोंदवावा असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.