मंगळवेढा येथे दामाजी चौकामध्ये सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

मंगळवेढा येथे दामाजी चौकामध्ये सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन.

       


                    मंगळवेढा: येथे आज १ डिसेंबर रोजी दामाजी चौक येथे मनसे तर्फे सर्व पक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आसल्याची माहिती मनसे चे जिल्हा समन्वयक नारायण गोवे यांनी दिली.

                     नगरपालिका,प्रांत अधिकारी,पोलिस स्टेशन,तहसीलदार यांना दि.१० नोव्हेंबर रोजी अवजड वाहतूक व पंढरपूर बायपास जवळ मरवडे हायवे जवळ कमान उभी करून दोन्ही कमानीवर प्रवेश बंदचा बोर्ड लावणे यासाठी कळविण्यात आले आहे.

                      शहरामध्ये आवजड वाहतुकीने आतापर्यंत आठ जण मृत्युमुखी पडले आहेत.जानेवारी २०२२  पासून या कामासाठी पत्रव्यवहार करून रस्ता रोको केलेला आहे.

                     तरी-पण नगरपालिकेने या कामाच्या- बाबतीत दुर्लक्ष केलेले होते परंतु 2 ऑक्टोबर 2023 रोजी अवजड वाहतुकीने एका महिलेचा मृत्यू झाला होता तेव्हा सर्व पक्षाने व जनतेने आवाज उठवला तेव्हा दोन्ही रस्त्यावर फाउंडेशनचे काम  तयार केले.

               


                   हे काम करून साठ दिवस झाले परंतु कमान उभी केलेली नाही आणखी कोणाच्या मरण्याची वाट पाहत आहात काय? पोलीस स्टेशन ने अवजड वाहतूक बंद केलेले नाही नगरपालिकेने कमान उभा केलेले नाही म्हणून जोपर्यंत कमान उभारत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते रास्ता रोको पासून दूर होणार नसल्याचे नारायण गोवे यांनी सांगितले.

                 यावेळी सर्वपक्षीय काँग्रेसचे मारुती वाकडे, राजाभाऊ चेळेकर, प्रशांत साळे,जयश्री कवचाळे,आयेशा शेख तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रथमेश पाटील ,चंद्रशेखर कोंडूभैरी,जमीर इनामदार,वैभव ठेंगिल, संगीता कट्टे ,स्मिता अवघडे शिवसेना गट प्रा.येताळा भगत, तुकाराम कुदळे,गणेश कुराडे, क्रांती दत्तू,नंदा ओमने.

                भाजपचे राजेंद्र सुरवसे,शशिकांत चव्हाण,गौरीशंकर बुरकुल,आदित्य हिंदुस्तानी शेतकरी संघटनेचे ॲड. राहुल घुले ,युवराज घुले,वारी परिवार,आरपीआयचे अशोक शिवशरण, डिके साखरे शिवसेना शिंदे गटाचे अमित किल्लेदार,अशोक चौंडे, स्वप्निल निकम प्रहार संघटनेचे समाधान हेंबाडे मनसे चंद्रकांत पवार, शंकर गांडुळे,भारती चौगुले,राजवीर हजारे,सुरज काशीद, सुखदेव जोध ज्योती ओमने, देवदत्त पवार, रमेश ढगे ,श्रीकांत पवार यांच्यासह सर्वपक्षीय शहर व तालुक्यातील पदाधिकारी यांनी दामाई चौकामध्ये अकरा वाजता उपस्थित राहावे असे आवाहन नारायण गोवे यांनी केले आहे.



test banner