सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत श्री संत दामाजी महाविद्यालय द्वितीय. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत श्री संत दामाजी महाविद्यालय द्वितीय.

 


          

                  मंगळवेढा:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन खो-खो क्रीडा स्पर्धेमध्ये श्री विद्या विकास मंडळ मंगळवेढा संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

                    उपविजेतेपद पटकविलेल्या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा गणेश जोरवर व प्रा विजय दत्तू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सदर यशाबद्दल सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ एन बी पवार,उपप्रचार्य सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक राजेंद्र गायकवाड, नॅक समन्वयक प्रा डॉ पी एम होनराव, यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.


test banner