ॲग्रीकॉस एक्सपोर्टस् प्रा. लि. कंपनी च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०२३

ॲग्रीकॉस एक्सपोर्टस् प्रा. लि. कंपनी च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..

 


        

                                                                                                           शेतकऱ्याची पोरं लय हुश्यार हायती, 


                      शेती क्षेत्रात काम करता करता आपली ही कंपनी असावी असे स्वप्न उराशी बाळगले. आणि ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि आपली स्वतः ची शेतकऱ्यांना आपली कंपनी वाटावी असे काम सुरू करतच ॲग्रीकॉस कंपनी एकदाची ११ नोव्हेंबर २०१६ रोजी सुरु झाली.  

                    आज या कंपनीला सात वर्षे पूर्ण झाली आणि अनेक चॅलेंज स्विकारत या कंपनीने आज आठव्या वर्षात पदार्पण केले. हा प्रवास करत असताना केवळ दोनच लोक काम करत होते. शेती क्षेत्रातील ॲग्री एम. एस. सी. ची डिग्री घेत शहाजी घाडगे व अजय आदाटे या मित्रांची जोडी दरमजल करत अनेक प्रोडक्ट शेतकऱ्यांच्या सेवेत आणले. रिझल्ट येणारे प्रोडक्ट असल्यामुळे या कंपनीने महाराष्ट्रात अल्पावधीतच आपला एक वेगळा ठसा उमटवला. 

       


          हे दोस्त स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी माहिती होत्या. त्या अडचणी वर मात करत त्यांनी अनेक प्रोडक्ट आणले . त्याला शेतकर्यांची पहिली पसंती मिळाली . त्यामुळे पुढे अनेक प्रोडक्ट शेतकर्‍यांच्या सेवेत आले . कामाचा व्याप वाढत गेला आणि कंपनी विस्तारत गेली . कंपनीचा विस्तार आज महाराष्ट्रात झाला आहे. 

                  हे करत असताना शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक माती-पाणी परिक्षण लॅब चालू केलीय . सर्व जिवाणूं खतांची मोठी रेंज आता बाजारात येतेय . शेतकऱ्यांच्या पोरांनी सुरु केलेली अँग्रीकॉस एक्सपोर्टस् कंपनी ला बघता बघता सात वर्षे पूर्ण झाली आणि ही कंपनी शेतकऱ्यांच्या मनात घर करून राहिली . एखादी नवखी कंपनी तिही शेतकऱ्यांच्या पोरांनी सुरु केलेली कंपनी सात - आठ वर्षात नावारूपाला येणे काही सोपी गोष्ट नव्हती . त्यासाठी अजय आदाटे व शहाजी घाडगे यांनी अहोरात्र मेहनत घेतली . पुढच्या काळात शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी चांगली साथ मिळेल याच अपेक्षांसह सर्वांचे आभार ...!


                शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने ॲग्रीकॉस एक्सपोर्टस् प्रा. लि. आज ८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. तुमचे असेच पुढेपण आमच्यावर विश्वास, प्रेम आणि जिव्हाळ्याचे नाते कायम राहील अशी आम्ही आशा करतो.


✨ॲग्रीकॉस एक्सपोर्टस् प्रा. लि. कंपनी च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...💐💐💐test banner