Dr . AGRICOS (शेतीचा डॉक्टर)
ॲग्रीकॉस एक्सपोर्टस् प्रा. लि.
वर्धापन दिन ११ नोव्हेंबर २०२३
आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मातीपाणी परीक्षणानुसार शेतकरी बांधवाना अहवाल देण्याचा कार्यक्रम ॲग्रीकॉस एक्सपोर्टस्च्या माध्यमातून आखण्यात येणार आहे. मृदा संरक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकत माती आणि पाणी परीक्षण यंत्रणा उभी करण्याचे योजिले आहे.
ही सेवा शेतकरी बांधवांकरिता सुरू झालेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
शेतकरी जेव्हा शेतामध्ये पिकांची लागवड करतात त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करण्यासाठी मातीत देखील त्या पिकाला आवश्यक असणारे गुणधर्म असणे आवश्यक असते. तरच उत्पादन देखील चांगले येते. परंतु बऱ्याचदा मातीचे गुणधर्म न पाहता पिकांची लागवड केली जाते व अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो परंतु हव्या त्या प्रमाणात उत्पादन निघत नाही.
यावरच उपाय म्हणून शेतकऱ्यांना मातीचे गुणधर्म कोणत्या प्रकारचे आहेत हे लक्षात घेऊन पीक लागवडी संदर्भातील निर्णय घेता येणार आहे.
आजच्या ॲग्रीकॉस च्या वर्धापनदिनी माती परीक्षणासाठी केलेली असून इथून पुढे शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये अचूक तंत्रज्ञानाने माती परीक्षण करून दिले जाईल आणि त्याच्यानुसार लागवडी च्या पिकांचे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे पॅटर्न वापरून जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी खर्चामध्ये काढण्यासाठी नियोजन दिले जाईल.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी डॉक्टर ॲग्रीकॉस कडे संपर्क करावा.
डॉ. ॲग्रीकॉस 9403460194, 9403852896
ॲग्रीकॉस एक्सपोर्ट्स प्रा.ली., पुणे.