मंगळवेढा:मंगळवेढा ते रायगड ऐतिहासिक सायकल मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सर्व सायकलस्वारांचा सप्तश्रृंगी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यानंतर प्रा.विनायक कलुबर्मे यांनी सायकल राईड मध्ये आलेले अनुभव सांगितले. यावेळी वारी परिवार सायकल क्लबचे सुहास ताड,सौरभ मुढे,समर्थ महामुनी,पवन टेकाळे,संजय जावळे,पांडुरंग कोंडूभैरी,हर्षद वस्त्रे,स्वराज कलुबर्मे,रोहन सुर्यवंशी,सिद्धेश्वर डोंगरे,प्रा विनायक कलुबर्मे या सायकलपट्टूंचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष शामराव जठार,माजी अध्यक्ष शरद हेंबाडे, दत्तात्रय जावळे,शिवाजी नागणे,दिलीप वाडेकर,नागेश डोंगरे, यांचेसह पांडुरंग नकाते,प्रशांत चव्हाण,दामोदर जठार,सुर्याजी नागणे,भिमसेन बिरादार,सुशिल शिंदे,आदित्य कारंडे,तेजस सुर्यवंशी संभाजी नागणे,विलास सांवजी,शिवाजी जगदाळे एकनाथ खटकळे,रणजित चेळेकर,अजित गोवे उपस्थित होते.