राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मा.अभिजीत पाटील यांच्याकडून महसूल तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दूध दरवाढीच्या समस्येबद्दल निवेदन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मा.अभिजीत पाटील यांच्याकडून महसूल तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दूध दरवाढीच्या समस्येबद्दल निवेदन.

   


                  पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील दूध दरवाढीच्या समस्येबाबत महसूल तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांची श्री विठ्ठल शुगर चे चेअरमन व राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील यांनी त्यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले.ढ

               पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यामध्ये दुग्ध व्यवसाय हा प्रमुख घटक आहे २ महिन्यांपूर्वी ४० रुपये पर्यंत दुधाला दर मिळत होता. सद्यस्थितीला हा दर २५ रुपये पर्यंत येऊन ठेपला आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील दूध व्यवसाय अडचणीत सापडलेला आहे. चालू वर्षी पर्जन्यमान ही कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

              शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय ओळखला जातो. त्यामुळे शासनाने नव्याने नेमलेल्या निर्णयानुसार दूध व्यवसाय धारकांना योग्य दर मिळून न्याय मिळावा या दृष्टीने चर्चा करून बैठक लावण्याबाबत पत्राद्वारे निवेदन दिले.



test banner