'रयत' या शब्दातील शिवतत्व जोपासणारे कर्मवीर भाऊराव पाटील आणि यशवंतराव चव्हाण. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

'रयत' या शब्दातील शिवतत्व जोपासणारे कर्मवीर भाऊराव पाटील आणि यशवंतराव चव्हाण.



                           मी एक रयत चा विद्यार्थी आणि वडील ही मुख्याध्यापक म्हणून रयत मधूनच निवृत्त झाले, त्यामुळे रयत बद्दल कमालीचा जिव्हाळा असणे हे आपसूकच आल, आता २३ वर्ष झाली रयत ची शाळा सोडून पण एक नवीन माहिती सहजच बघण्यात आली आणि थोडा खोलवर वाचन केलं आणि जी माहिती मिळाली तीच संकलन देत आहे, 

                          आज २५ नोव्हेंबर २०२३ म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब यांचा पुण्यतिथी चा दिवस. 

                         यशवंतराव स्वतंत्र महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि द्रष्टेपणा पाहणे संयुक्तिक ठरते. यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राची जमीन, माती, निसर्ग, इतिहास, संस्कृती, भाषा, परंपरा या सर्वांसंबंधी अंतकरणात जिव्हाळा आणि प्रचंड आपुलकी होती. सर्वार्थाने समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न त्यांनी पाहिले होते आणि त्यानुसार विचार आणि कार्यही केलेले होते. पराक्रम, भक्ती, शौर्य, त्यागाच्या परंपरेविषयी त्यांना जाण होती. तसेच आधुनिक विचारधारा त्यांच्या रक्तात मुरलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राच्या इतिहासाने नवा जन्म घेतल्याची कल्पना त्यांना होती; म्हणून विसाव्या शतकातील महाराष्ट्राला नवा चेहरा देण्यासाठी कृतज्ञतेच्या भावनेने त्यांनी अलौकिक असे कार्य केले. मार्क्सवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद, समाजवादाच्या समन्वयातून मानवतावादी महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी प्रयत्न केले. महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा बनवण्याकरता वैचारिक रुजवणूक केली. 


                      रयत या शब्दाला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. रयत म्हणजेच सामान्य जनता. रयत शब्द उच्चारताच मराठी माणसाच्या डोळ्यापुढे दोन गोष्टी उभ्या राहतात. एक म्हणजे छत्रपती शिवरायांनी उभे केलेले हिंदवी स्वराज्य आणि दुसरे म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभी केलेली रयत शिक्षण संस्था. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य हे रयतेचे राज्य होते आणि रयत शिक्षण संस्थेच्याही केंद्रस्थानीही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्य माणूस, समाजाच्या शेवटच्या पायरीवरील माणसाची मुले केंद्रस्थानी ठेवली होती. महाराष्ट्राच्या या दोनही वारश्यासोबत यशवंतराव चव्हाण यांचा निकटचा संबंध आला. आधुनिक लोकशाहीच्या काळात महाराष्ट्राच्या राजसत्तेची गादी अर्थात सुरुवातीला द्वैभाषिक मुंबई राज्याचे आणि 1 मे 1960 पासून संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद यशवंतराव चव्हाण साहेबांना मिळाले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या महापरिनिर्वाणानंतर रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याकडे सोपवण्यात आली. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या राजकारणाच्या व धोरणाच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य माणूसच ठेवला होता.

                       कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयतच्या माध्यमातून ज्या भागापर्यंत, वर्गापर्यंत शिक्षण पोहोचले नव्हते त्यांच्यापर्यंत कर्मवीर अण्णांनी ज्ञानगंगा नेली. रयतच्या 'वटवृक्षाखाली बसून पिढ्यानपिढ्या अडाणी असलेल्यांच्या लेकरांनी अक्षरे गिरवायला सुरुवात केली. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांचा शिक्षण वारसा कर्मवीर अण्णांनी पुढे नेला. 9 मे 1959 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले. त्यानंतर रयत मधील अण्णांच्या सर्व सहकाऱ्यांनी यशवंतरावजी चव्हाण साहेबांना रयतचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. यशवंतरावजी चव्हाण हे मुख्यमंत्री आहेत म्हणून रयतच्या

               


          पदाधिकाऱ्यांनी चव्हाण साहेबांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पोरांना ईबीसी सारख्या सवलतीच्या माध्यमातून शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी आपले मुख्यमंत्रिपद पणाला लावणारा, बहुजनांचा शिक्षणाप्रती अपार तळमळ असलेला, चारित्र्यसंपन्न, नीतीवंत अशा यशवंत बळवंत चव्हाण या व्यक्तीला केलेली ती विनंती होती. तसेच रयत सारख्या संस्थेचे अध्यक्षपद भूषवणे ही बाब अत्यंत बहुमानाची आहे. एक प्रकारे हे अध्यक्ष पद म्हणजे यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या अंगी असलेल्या चारित्र्यसंपन्नता, निस्वार्थ वृत्ती, सामाजिक कळवळा, आर- पार नितळता व पारदर्शकता या गुणांवर शिक्कामोर्तब करणारे प्रमाणपत्र होते. याची जाणीव यशवंतरावजी चव्हाण साहेबांना होती म्हणूनच 1960 यावर्षी नेर्ले तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील रयतच्या शाळेचे 'कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय' आम करण करतांना चव्हाण साहेब म्हणतात, “मुंबई राज्याचा मुख्यमंत्री झाल्यावर मला जे समाधान झाले होते, त्यापेक्षा अधिक समाधान मला रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष झाल्याने होत आहे.”

                     कर्मवीर अण्णांनी घालून दिलेल्या शिस्त व संस्कारांमध्ये चव्हाण साहेबांनी रयतची पुढील वाटचाल सुरू ठेवली. दरवर्षी 9 मे रोजी अण्णांच्या पुण्यतिथी दिवशी आपल्या सर्व राजकीय व्यस्तता व कार्यक्रम बाजूला ठेवून चव्हाण साहेब सातारा येथे हजर राहात असत. याच दिवशी संस्थेची सर्वसाधारण सभा घेतली जात असे. या सभेतच संस्थेच्या पुढील वाटचालीच्या दिशा निश्चित केल्या जात असत. या सर्व बाबींमध्ये पुढाकार घेणारे रयतचे अध्यक्ष यशवंतरावजी चव्हाण साहेब मात्र संस्थेच्या दैनंदिन कामकाज, निर्णय प्रक्रिया, भरती व बदली प्रक्रियेमध्ये मात्र कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप करत नसत. कर्मवीर अण्णांच्या संस्थेला आपल्या कर्मांच्या माध्यमातून लोकाभिमुख करण्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी मोठी भूमिका बजावली. कर्मवीर अण्णांचे विद्यार्थी असतांना अस्पृश्यांच्या वसतिगृहाच्या उद्घाटनाला जाणे आणि तेथून परत आल्यानंतर वार्डनने दिलेले अंघोळ करण्याचे आदेश मोडणे किंवा यशवंतरावजी चव्हाण साहेबांचे अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरु करणे या दोनही

                साहेबांचे अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरु करणे या दोनही बाबी हे दोन महापुरुष एकाच कुळातील असल्याची साक्ष देतात.


               यशवंतराव आणि कर्मवीर अण्णांच्या विचार व कार्याला त्रिवार वंदन !



अजय आदाटे, मंगळवेढा 

९४०३४६०१९४




test banner