मंगळवेढा येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

मंगळवेढा येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन.                मंगळवेढा:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवेढा मध्ये उद्या शनिवार दि.११ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता जवाहरलाल हायस्कूलच्या भव्य प्रांगणामध्ये दिवाळी पहाटच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी यांनी दिली.

                  दिवाळी पहाट या कार्यक्रमा साठी मंगळवेढा येथील सुरसंगम ग्रुपचे कलावंत मराठी पहाट व भक्तिगीते कराओके ट्रॅकवरती सादर करणार आहेत.

                सदर दिवाळी पहाट या कार्यक्रमास उपस्थित राहून दिवाळीचा मनसोक्त आनंद घेऊयात असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी यांनी केले.


test banner