कामे वेळेवर न केल्यामुळे अधिकाऱ्यांचा गांधीगिरी पद्धतीने सत्कार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०२३

कामे वेळेवर न केल्यामुळे अधिकाऱ्यांचा गांधीगिरी पद्धतीने सत्कार.


           


    मंगळवेढा:मंगळवेढा शहरातील रस्त्यावरती स्पीड बेकर व जड वाहतूक बंदी संदर्भातील बोर्ड चार दिवसात बसवण्याचे लेखी आश्वासन देऊन देखील आज पंधरा दिवस उलटले तरी कोणतीही कारवाई केली जात नाही.

                     यामुळे आजपर्यंत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे. यापुढे देखील मंगळवेढातील नागरिकांच्या जीविताला धोका आहे.

                    त्याबद्दल मंगळवेढा नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे प्रमुख प्रशांत सोनटक्के यांचा हाल शाल फेटा देऊन वेळेवर काम न केल्याबद्दल गांधीगिरी पद्धतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मारुती वाकडे,सुहास पवार,सतीश दत्तू,नागेश डोंगरे,सिद्धेश्वर डोंगरे,सुरेश पाटील,आदित्य हिंदुस्तानी,अजय अदाटे,चंद्रकांत जाधव,दिग्विजय वाकडे उपस्थित होते.


test banner