श्री संत दामाजी महाविद्यालयात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उदघाटन कार्यक्रम संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उदघाटन कार्यक्रम संपन्न.



                  मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात दि १९ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उदघाटन देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले.


                ॲानलाईन झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एन बी पवार होते यावेळी ग्रामीण विकास कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी म्हणाले की भारताला जागतिक पातळीवर कौशल्य मनुष्यबळ पुरवठा करणारा सर्वात मोठा देश बनविण्याच्या निमित्ताने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र संपूर्ण महाराष्ट्रात स्थापन होत असून,सर्व प्रकारचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये यायला पाहिजेत व जागतिक पातळीवर स्किल बेस विद्यार्थी व मनुष्यबळ निर्माण करणे हे या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे सांगून सर्वांचे कार्यक्रमात स्वागत केले यावेळी प्राचार्य पवार म्हणाले की कौशल्य विकासाची भारताला कशाप्रकारे गरज आहे व जगामध्ये भारत देश कशाप्रकारे कौशल्य आधारित मनुष्यबळ पुरवू शकतो यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज राहिले पाहिजे असे सांगून त्यांनी महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे स्वागत केले महाराष्ट्रात ५११ केंद्रावरती ॲानलाईन पद्धतीने उदघाटन झाले.

              त्यापैकी श्री संत दामाजी महाविद्यालयातील व इतर महाविद्यालयातील ७२० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रम प्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र सुरवसे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे,शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवा प्रियदर्शनी महाडिक,विद्यापीठ सिनेट सदस्य सुदर्शन यादव,नागेश डोंगरे, संजय माळी,रविंद्र काशीद,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,शासकीय आयटीआय कॉलेजचे समन्वयक प्रकाश मोरे,पार्वती ताड आयटीआय कॉलेजचे प्राचार्य प्रवीण रुपनवर तसेच श्री संत दामाजी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत दामाजी महाविद्यालयाचे स्किल डेव्हलपमेंट समन्वयक प्रा डॉ जावेद तांबोळी यांनी परिश्रम घेतले तर प्रा डॉ राजकुमार पवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


test banner