मंगळवेढा: एरवी एखाद्या राजकीय पक्षाची सभा घायाची असली तर वाहांनाची व्यवस्था करून वेळे प्रसंगी माणसं आणावी लागतात. मात्र जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी मध्ये होणाऱ्या विराट मेळाव्यास स्वयंस्फूर्तीने व स्वखर्चाने प्रत्येकजण जाण्यासाठी सज्ज झाला आहे.
हा मेळावा आजपर्यंतच्या सर्व मेळाव्याचे रेकॉर्ड मोडून विक्रमी होईल त्यामुळे मराठा बांधवांचे गिनीच बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद होणार असल्याचा दावा सकल मराठा समाज मंगळवेढा यांच्या वतीने करण्यात आला.
स्वतःचा संसार उघड्यावरती टाकून मराठा समाजासाठी रक्ताचे पाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आपण आपला एक दिवस द्यायचा आहे,असे आवाहन सकल मराठा समाज मंगळवेढा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान अंतरवाली सराटी कडे निघालेल्या समज बांधवांना दत्ता मामा भोसले यांच्या कडून लाडू चिवड्याचे पाकीट देण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून झगडत आहे.सरकारने काही तज्ञ जाणकारांनी सांगून देखील वेळोवेळी फसवे आरक्षण देऊन समाजाला फसवले असल्याचे म्हटले आहे.
अंतरवाली सराटी येथील उपोषण कायद्याला धरून आहे.आधी मराठा आणि कुणबी एकच आहेत ते सिद्ध कर,या पद्धतीचे आहे,त्यामुळे समाजातील युवकांना कुठेतरी आता आपल्याला आरक्षण मिळेल अस वाटत आहे.
परंतु,जरांगे पाटील यांना चाळीस दिवसांचा अवधी दिला होता.तो काही दिवसात संपणार आहे.त्या पार्श्वभूमीवर १४ ऑक्टोबर रोजी पुढील दिशा ठरवण्यासाठी व आरक्षण समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन करण्यासाठी तब्बल दोनशे एकर जागेमध्ये ही सभा होणार आहे.
या सभेसाठी मंगळवेढा तालुक्यातुन हजारोंच्या संख्येने महिला,पुरुष,युवक जाणार आहेत.आपल्याला सभास्थळी व्यवस्थित जागा मिळावी यासाठी काही तरुण शुक्रवारी रवाना झाले आहेत.
काही तरुण गावातून शनिवारी पहाटे निघाले आहेत.प्रत्येकजण आपल्या सोबतच्या बांधवांची काळजी घेत आहेत.प्रतेक जण या सभेसाठी आपले योगदान देत आहे.