जय जवान गणेशोत्सव महिला मंडळाने दिला स्वच्छ मंगळवेढा सुंदर मंगळवेढ्याचा नारा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

जय जवान गणेशोत्सव महिला मंडळाने दिला स्वच्छ मंगळवेढा सुंदर मंगळवेढ्याचा नारा.



                           मंगळवेढा: जय जवान गणेशोत्सव महिला मंडळाने स्वच्छता मोहिमेमध्ये दिला स्वच्छ मंगळवेढा सुंदर मंगळवेढ्याचा  नारा सर्वप्रथम दत्तू-गुंगे गल्लीतील परिसराची स्वच्छता करून जिथे पाणी साचते त्या ठिकाणी खराब ऑइल ओतण्यात आले.


              त्यामुळे डासांच्या उत्पत्ती थांबणार आहे त्याचबरोबर डेंगू,मलेरीया,स्वाईन फ्लू प्रतिबंध जनजागृती प्रबोधनात्मक पत्रके वाटप करण्यात आली. तसेच ओला कचरा व सूका कचरा याचे विभाजन करून कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी याचेही प्रबोधन करण्यात आले मंडळाने स्वच्छतेचे उचलले पाऊल खूपच कौतुकास्पद आहे संत नगरीच्या स्वच्छतेमुळे रोगराईला आळा बसणार असून स्वच्छ व सुंदर मंगळवेढा निर्माण होण्यास मदत होणार आहे .


                        सदर उपक्रमास मंगळवेढा नगरपरिषद व श्याम मेडिकलचे विजय ठेंगील यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी जय जवान गणेशोत्सव मंडळच्या सर्व पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

test banner