मंगळवेढा:वारी परिवार मंगळवेढा व शिवसेना शहर समन्वय नारायण गोवे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातून होणारे जड वाहतूक प्रतिबंधात्मक उपाय योजनेची बैठक पार पडली.
यामध्ये विविध विषयावर चर्चा होऊन तातडीने कार्यवाही होण्यासाठी बाह्यवळण मार्गावर पंढरपूर रोड श्री घाडगे कनेक्शन येते व विजापूर रोड पुलाजवळ मंगळवेढा पोलीस स्टेशनकडून होमगार्ड ची नेमणूक तातडीने करण्यात येणार आहे. सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत शहरातून जड वाहतुकीस मनाई असले बाबतचे मराठी,हिंदी,इंग्रजी अक्षरातील बोर्ड तयार करून शहरात प्रवेश होणारे पंढरपूर रोड श्री घाडगे कनेक्शन येथे व विजापूर रोड पुलाजवळील बाह्यवळण मार्गावर मंगळवेढा नगरपरिषदेकडून बोर्ड लावण्यात येणार आहेत तसेच राष्ट्रीय महामार्गावरील नियमांचे पालन करून मंगळवेढा नगरपरिषदेकडून प्रकाश परावर्तित होणारे रबरी गतिरोधक बसविण्यात येणार आहेत असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी योगेश डोके,सचिनदादा राठोड,रेवनाथ डमाळे,धनंजय निकम,संदीप सोनटक्के,सचिन मिसाळ,विनायक साळुंखे,प्रकाश गायकवाड,सतीश दत्तू नारायण गोवे,हर्षद डोरले,संजय भोसले,प्रतीक किल्लेदार,सचिन माने,चंद्रकांत पवार,देवदत्त पवार,प्रफुल्ल सौंदळे,दत्तात्रय वर्पे,सचिन हेंबाडे,एस एस पवार,बाळासाहेब नागणे उपस्थित होते.