जय जवान गणेशोत्सव महिला मंडळाच्या 111 जणांनी केला नेत्रदानाचा संकल्प. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

जय जवान गणेशोत्सव महिला मंडळाच्या 111 जणांनी केला नेत्रदानाचा संकल्प.
             मंगळवेढा:महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जय जवान गणेशोत्सव महिला मंडळाच्या 111 जणांनी केला नेत्रदानाचा संकल्प.


                               निसर्गाने घडवलेल्या सृष्टीचे सौंदर्य‌,रंग आकार व व्यक्तीचे भाव सहजपणे टिपण्याचे सामर्थ्य आपल्या डोळ्यामुळे मिळते या वरदानाचा उपयोग आपल्याला आयुष्यभर होतो.पण या अलौकिक वरदानाचा लाभ जीवनानंतरही नेत्रदान करून इतरांना दिला आहे नेत्रदान सारख्या राष्ट्रीय कार्यक्रमातला सहभाग प्रशसनिय आहे मंडळाच्या वतीने नेत्रदान करणाऱ्या प्रत्येक सदस्याला प्रमाणपत्र देण्यात आले. नेत्रदान केलेले फॉर्म जिल्हा अंदाज व नियंत्रण समिती सोलापूर यांच्याकडे देण्यात आले. 


                           कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या गुंगे,कोमल गायकवाड,जस्मीन मुजावर,मनीषा दत्तू,रूपाली कसगावडे,संगीता आवताडे,सोनाली घुले, रंजना पवार,कोमल शिंदे,कल्पना जठार,अश्विनी कदम,वर्षारानी मोरे,उज्वला गणेशकर,अर्चना केंदुले,हेमलता नकाते,संगीता घाडगे, सुनिता इंगळे,संगीता शिंदे,बबीता पवार,लता चव्हाण यांनी परिश्रम घेतले.


test banner