मंगळवेढ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाला सुरुवात,आजपासून पुन्हा एकदा एक मराठा,लाख मराठा! आरक्षणाचा मुद्दा तापणार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

मंगळवेढ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाला सुरुवात,आजपासून पुन्हा एकदा एक मराठा,लाख मराठा! आरक्षणाचा मुद्दा तापणार.

                   


                       मंगळवेढा:उपोषणकर्ते मनोज जरांगे हे गेले 14 15 दिवस झाले मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसले आहेत.त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात आजपासून आंदोलन करण्यात येणार.


          आजपासून मंगळवेढा शहर व तालुक्यात आठवडाभर शांततेत साखळी आंदोलन करण्यात येणार आहे.

               साखळी आंदोलनाची सुरुवात आजपासून सुरू होणार आहे.त्यामध्ये आज सकाळी 11 वाजता दामाजी चौकामध्ये रस्तारोको व साखळी आंदोलनास सुरुवात करण्यात येणार आहे.


     तसेच उद्या बुधवार दि.13 सप्टेंबर रोजी सर्व शासकीय कार्यालये,शाळा,महाविद्यालय,बँका,खाजगी संस्था, एसटी बंद चे आवाहन करण्यात आले आहे.

     गुरुवार दि.14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आक्रोश मोर्चा निघणार आहे.दामाजी चौकातून सुरुवात होऊन शिवजयंती मिरवणूक मार्गे काढण्यात येणार आहे.

    शुक्रवार दि.15 सप्टेंबर रोजी अर्धनग्न व मुंडण आंदोलन सकाळी 10 वाजता दामाजी चौकात करण्यात येणार आहे.


           शनिवार दि.16 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दामाजी चौकामध्ये रक्तरंजीत सह्यांचे आंदोलन करण्यात येणार आहे.

रविवार दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दामाजी चौकात चक्काजाम व अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहेत.


          अश्याप्रकारे आजपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

              मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात येत होते. दरम्यान, त्यावेळी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. त्यामध्ये अनेक आंदोलनकर्ते,गावकरी,महिला जखमी झाले होते.


           मराठा आरक्षणच्या मागणीसाठी व जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी उपोषण,आंदोलन कुठे रस्ता रोको करण्यात येत आहे.


test banner