राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिक गुंगे यांच्या प्रयत्नाला यश - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिक गुंगे यांच्या प्रयत्नाला यश

        


               मंगळवेढा:राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिक गुंगे यांच्या प्रयत्नाला यश विभागीय अधिकारी सोलापूर यांच्याकडे केली होती मागणी.


                   मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी व शिरशी ही गावे केले अनेक वर्षे एसटी पासून वंचित राहिली होती याची दखल घेऊन मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष श्री माणिक गंगे यांनी मंगळवेढा आगार तसेच विभागीय आगार प्रमुख सोलापूर श्री.अजय पाटील साहेब यांच्याशी पत्र व्यवहार करून एस.टी.ची मागणी केली होती. 

         


     मंगळवेढा तालुक्यातील अशी एकमेव दोन गावे आहेत की त्या गावाला गेली किती वर्षे एसटी चालू नव्हती या परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिलावर्ग व युवक यांना येण्या जाण्याची गैरसोय होत होती परंतु माणिक गुंगे यांनी एसटी चालू करणारच हा ध्यास घेतल्याने त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. एसटी चालू झाल्यापासून या गावातील व परिसरातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.

               सोमवार दिनांक 11.9. 2023 रोजी शिरशी गावातून ठीक 7:15 वाजता एस.टी. निघाली व गोणेवाडी येथे एसटीचे पूजन करण्यात आले या प्रसंगी मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी गावकरे, मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. माणिक गुंगे,  गोणेवाडी गावचे मिस्टर सरपंच बाबासाहेब मासाळ, माजी उपसरपंच विष्णू मासाळ, पप्पू माने, विलास गवळी, मच्छिंद्र काळे, साधू गरंडे, युवराज जाधव, ज्ञानेश्वर मासाळ, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते तसेच पहिल्याच दिवशी शिरशी व गोणेवाडी येथील 15 प्रवाशांनी एसटीचा लाभ घेतला व यापुढेही एस.टी‌.चा प्रवास सुखाचा प्रवास म्हणत या भागातील लोकांनी या एस.टी.चा लाभ घ्यावा असे प्रतिपादन मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.माणिक गुंगे यांनी केले.


test banner