जय जवान गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विद्या गुंगे उपाध्यक्षपदी कोमल गायकवाड व सचिवपदी जस्मीन मुजावर यांची निवड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

जय जवान गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विद्या गुंगे उपाध्यक्षपदी कोमल गायकवाड व सचिवपदी जस्मीन मुजावर यांची निवड.




                        मंगळवेढा:गेल्या अनेक वर्षापासून मंगळवेढा शहरांमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यासह महिलांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवणाऱ्या जय जवान गणेशोत्सव  मंडळाच्या आढावा बैठकीत यंदाच्या गणेशोत्सव मंडळाचा कारभार महिलांच्या हाती देण्याचे ठरले.


         यामध्ये मंडळाच्या अध्यक्षपदी विद्या गुंगे उपाध्यक्षपदी कोमल गायकवाड व सचिवपदी जस्मीन मुजावर यांची  निवड एकमताने करण्यात आली.


              तर सदस्य म्हणून मनीषा दत्तू,रूपाली कसगावडे,संगीता आवताडे,सोनाली घुले,कल्पना जठार,अश्विनी कदम,वर्षारानी मोरे,उज्वला गणेशकर,अर्चना केंदुले,हेमलता नकाते,संगीता शिंदे, लता चव्हाण यांचा समावेश करण्यात आला यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवेढा तालुक्यात प्रथमच सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकारी म्हणून महिलांना संधी मिळालेली आहे त्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


test banner