वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर तालुक्यात शाखेचे उद्घाटन . - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर तालुक्यात शाखेचे उद्घाटन .

 


        पंढरपूर:   वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुक्यामधील सिद्धेवाडी या ठिकाणी शाखेचे उद्घाटन सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती माढा लोकसभा जिल्हा उपाध्यक्ष विजय कोकणे,माळशिरस तालुका उपाध्यक्ष प्रदीप सरवदे,जिल्हा उपाध्यक्ष रवी सर्वगोड  तसेच जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष कांबळे,शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे, तालुका महासचिव कैलास ओव्हाळ,पंढरपूर तालुका सचिव सज्जन मस्के, मंगळवेढा तालुका अध्यक्ष अशोक माने, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ गायकवाड,तालुका संघटक मोहन वाघमारे तालुका,युवक उपाध्यक्ष गणेश बाबर, तालुका युवक अध्यक्ष सचिन तुपलोंढे,पंढरपूर शहर महासचिव सुनील दंदाडे आदी उपस्थित होते.

        शाखा उद्घघाटना प्रसंगी विविध पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शाखाध्यक्ष शहाजी भोपळे,शाखा उपाध्यक्ष सागर तोरणे,शाखा महासचिव विक्रम तिकुटे,शाखा संघटक गणेश गोडसे,शाखा सदस्य विशाल भोपळे,तुषार तोरणे, समाधान मस्के,विकास वाघमारे,बाजीराव भोपळे, अमित भोपळे व सिद्धेवाडी मधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच पंढरपूर तालुका प्रसिध्दी प्रमुख पदी तेजस तिकुटे यांची नूतन नियुक्ती करण्यात आली.


test banner