मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयामध्ये मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल क्रांती पवार यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ एन बी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ पवार म्हणाले अतिशय गरीब परिस्थितीतून कॉन्स्टेबल ही नोकरी करत असताना आत्मविश्वास व जिद्दीच्या बळावरती क्रांती पवार यांनी यश मिळवलेले आहे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी मिळवलेले यश खरोखरच इतरांसाठी खूप प्रेरणादायी आहे असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी क्रांती पवार म्हणाल्या की, माझा हा यशाचा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता तो खूपच संघर्षाचा होता आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेणे ही अवघड झाले होते दुसऱ्यांच्या शेतात रोजगाराने कामाला जाऊन पैसे जमा केले अशा काळात माझ्या शाळेतील,महाविद्यालयातील शिक्षकांनी खूप मोलाची मदत केली सासरकडील आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती सासू-सासरे अशिक्षित,माझ्या पतीलाही रोज दुसऱ्याच्या द्राक्ष शेतीमध्ये कामाला जावे लागायचे त्यातून जमा होणाऱ्या पैशातून मी शिकले एका बाजूला पोलीस खात्यातील नोकरी दुसऱ्या बाजूला कुटुंब,तिसऱ्या बाजूला परीक्षेची तयारी अशी माझी कसरत चालू होती स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाबरोबर शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी, त्याच्या सरावासाठी माझ्या पतीने मला शेताच्या बांधावरच सरावासाठी जागा करून दिली असेही त्यांनी सांगितले यावेळी उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे, पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड यांचेसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा डॉ संजय क्षीरसागर यांनी केले तर प्रा डॉ परमेश्वर होनराव यांनी आभार मानले.