माजी सैनिक व वारी परिवाराच्या वतीने कारगिल युद्धातील सैनिकांना श्रद्धांजली अर्पण. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २६ जुलै, २०२३

माजी सैनिक व वारी परिवाराच्या वतीने कारगिल युद्धातील सैनिकांना श्रद्धांजली अर्पण.

  मंगळवेढा: मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटना व वारी परिवाराच्या वतीने कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून २६ जुलै कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.


         सुरवातीस सैनिकांच्या शौर्याची प्रतिक असलेल्या बंदुकीचे पूजन वीरपत्नी शामल माने व लक्ष्मी पवार यांच्या हस्ते व मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ,मेजर मल्लया स्वामी,सुहास माने यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सुरसंगम ग्रुपकडून निशीकांत प्रचंडराव,दिगंबर भगरे,लहू ढगे,अल्ताफ मुजावर यांनी देशभक्तीपर गीतातून सैनिका बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली तर सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ व मेजर मल्लया स्वामी यांनी कारगिल युद्धातील अनेक आठवणी सांगितल्या.

         यावेळी के के लिगाडे, मुबारक मुलाणी,दयानंद गायकवाड, ज्ञानेश्वर रायबान, सिद्धेश्वर कनुरे, सय्यद इनामदार, हनुमंत खिलारे, धनाजी शिंदे, चंगेजखान इनामदार, अण्णाप्पा धसाडे, सूर्यकांत सुडके,तानाजी माने,महादेव दिवसे, कृष्णा पडवळे,आबाजी जाधव या सर्व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी विलास आवताडे,रामचंद्र दत्तू,लक्ष्मण नागणे,राजेंद्र जाधव,माणिक गुंगे, अरूण गुंगे,चंद्रकांत चेळेकर,सुदर्शन ढगे,पांडुरंग कोंडुभैरी,सुरेश माळी,विनायक सोमदळे,नाना भगरे, स्वप्निल फुगारे,समिर गुंगे,रवि जाधव, फारूख मुजावर,सतिश दत्तू उपस्थित होते.

        सदर देशभक्तीपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा विनायक कलुबर्मे यांनी केले याप्रसंगी एनसीसी मधील विद्यार्थ्यांकडून माजी सैनिकांना सलामी देऊन राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.

test banner