मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटना व वारी परिवाराच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा होणार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

संवाद न्यूज चॅनेल लवकरच

बुधवार, २६ जुलै, २०२३

मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटना व वारी परिवाराच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा होणार.

 मंगळवेढा:  मंगळवेढ्यात माजी सैनिक संघटना मंगळवेढा तालुका व वारी परिवाराच्या वतीने २६ जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे.


          दुर्दम्य आशावाद,असामान्य कर्तृत्व,प्रखर राष्ट्रनिष्ठा व आदम्य साहस असणारे भारतीय सैनिक आपल्या कुटुंबापासून दुर राहून देशाच्या सिमेवरती आपले रक्षण करीत असतात सन १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात आपल्या भारतीय सैनिकांनी जिवाची बाजी लावून विजय मिळविला त्या जवानांच्या शौर्याला व पराक्रमाला सलाम करावा या हेतुने कारगिल युद्धात शहिद झालेल्या जवानांबद्दल एक दिवा कृतज्ञतेचा म्हणून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

      सदर कार्यक्रम आज सायंकाळी ५ वाजता मारुती पटांगणात होणार असून सर्व देशप्रेमी नागरिकांनी 

उपस्थित राहावे असे आवाहन माजी सैनिक संघटना व वारी परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.