मनसेचा मनसे स्टाईल उपक्रम, एक सही संतापाची.. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ९ जुलै, २०२३

मनसेचा मनसे स्टाईल उपक्रम, एक सही संतापाची..

 महाराष्ट्राचा राजकीय घडामोडी विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतांपाचे वातावरण असताना मंगळवेढ्यात मनसे पदाधिकाऱ्यांनी मनसे स्टाईल उपक्रम हाती घेतला.


सुरू असलेल्या विविध राजकीय घडामोडी विरोधात एक सही संतापाची असा अनोखा उपक्रम राबवला.महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष राजवीर हजारे यांच्या नेतृत्वाखाली दामाजी चौकामध्ये ही मोहीम राबवण्यात आली. घेतलेले या मोहिमेमध्ये अनेक लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात नोंदवला गेला. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष शंकर गांडूळे,महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारतीताई चौगुले,जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई ओमानी,सहकार सेना तालुकाध्यक्ष चौगुले,विद्यार्थी सेना तालुकाअध्यक्ष रवी कोरे,शहराध्यक्ष राजवीर हजारे वाहतूक शहराध्यक्ष कृष्णा ओमनी, तालुका संघटक अमोल मोरे व अन्य मनसे सैनिक उपस्थित होते.

test banner