जल जीवन मिशन अंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना नळ पाणी पुरवठा योजनांसाठी २६ कोटी रु.निधी मंजूर-आ.समाधान आवताडे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

जल जीवन मिशन अंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना नळ पाणी पुरवठा योजनांसाठी २६ कोटी रु.निधी मंजूर-आ.समाधान आवताडे

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग संलग्न जल जीवन मिशन अंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना नळ पाणी पुरवठा योजनांच्या कार्यवाहीसाठी २६ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील नळ पाणी पुरवठा अधिकतम गतिमान होण्यासाठी आ. आवताडे यांनी वेळोवेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन सोलापूर यांच्याकडे पाठपुरावा करून सदर योजनेसाठी भरीव निधीची तरतूद आपल्या मतदारसंघांसाठी पदरात पाडून घेतली आहे. जिल्ह्याच्या निरनिराळ्या भागातील पाणी पुरवठा साधनांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कार्यउपक्रम राबवत आहेत. पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावे नळ पाणी पुरवठा योजनेपासून वंचित आहेत अशा गावांच्या वास्तविक पाणीपुरवठा सोयी - सुविधांची सखोल माहिती घेऊन आ. आवताडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून या योजनेसाठी गती प्राप्त करून घेतली होती.

पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी निवड झाल्यापासून आ. समाधान आवताडे यांनी मतदारसंघातील मूलभूत आणि पायाभूत विकासाच्या धोरणात्मक बाबींकडे विशेष लक्ष देऊन मतदारसंघातील पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी आदी प्रश्नांना हात घालून जनतेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्या राजकीय व सामाजिक कार्यनेतृत्वास न्याय देण्याचा विधायक पद्धतीने प्रयत्न केला आहे. आ. आवताडे यांनी आतापर्यंत वर्षानुवर्षे शासनदरबारी लाल फितीच्या कचाट्यात अडकलेल्या २४ गावे जल उपसा सिंचन योजना पाणीप्रश्न असो अथवा मतदारसंघातील रस्ते चकाचक करणे असो किंवा दोन्ही तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेला मूर्त रूप देणे असो अशा विविध पातळ्यांवर जनतेचे हित समोर ठेवून सचोटीने प्रयत्न करून यशप्राप्ती केली आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सदर निधी मंजूर झाल्याने या योजनेत समाविष्ट असलेल्या विविध गावांना आता पाणी पुरवठा योजनेची आणखी एक परिपूर्ण भौतिक सुविधा उपलब्ध झाल्याने सदर योजनेच्या गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आ. समाधान आवताडे यांच्या सर्वसमावेशक कार्यनितीचे कौतुक केले आहे.


जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट झालेली पंढरपूर तालुक्यातील गावे व मंजूर निधी पुढीलप्रमाणे -त.शेटफळ - १ कोटी ५ लाख, सिद्धेवाडी (चिचुंबे) - २ कोटी ९९ लाख, बोहाळी - ८५ लाख, शिरगांव - १ कोटी ६ लाख, कासेगाव १ कोटी ९९ लाख, तनाळी ३३ लाख.


मंगळवेढा तालुक्यातील समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे -

कात्राळ - ९९ लाख, आसबेवाडी - ५५ लाख, मुढवी - ५६ लाख, सलगर खु - ७१ लाख, कचरेवाडी - ६७ लाख, रेवेवाडी - ८९ लाख, शिरनांदगी - ६९ लाख, जंगलगी - २८ लाख, खुपसंगी - ८५ लाख, लोणार - १ कोटी ५७ लाख, महमदाबाद (हु) - ९७ लाख, चिक्कलगी - १ कोटी ३७ लाख, ढवळस - ९० लाख, नंदेश्वर - १ कोटी ९९ लाख, पडोळकरवाडी ९२ लाख, जुनोनी - ३७ लाख, महमदाबाद (शे) - ९० लाख, मारोळी - ७९ लाख, तळसंगी - १ कोटी ९ लाख, माचणूर - ६० लाख, डोंगरगाव - ७० लाख, सिद्धापूर - ३१ लाख.


test banner