पक्षाचे झेंडे बाजुला ठेवून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित यावे-अॕड.राहुल घुले - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

पक्षाचे झेंडे बाजुला ठेवून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित यावे-अॕड.राहुल घुले

 मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्यात उस गाळप हंगाम सुरू होऊन तीन आठवडे उलटले तरी सोलापूर जिल्ह्यातील कारखाने मात्र अद्याप पूर्ण क्षमतने सुरू झालेले नाहीत कारण सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येत उस संघर्ष समिती स्थापन केली असून समितीने आठवड्यापूर्वी पंढरपुरमध्ये उस परिषद घेऊन जिल्ह्यातील उसाला पहिली उचल 2500 तर अंतिम दर 3100 रूपये मागणी केली असून अद्याप एका ही कारखान्याने उस दर जाहीर केला नसुन जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत जिल्ह्यातील अनेक ग्रामपचायतीतर्फे ठराव केले असून उस दर जाहीर होपर्यंत उसतोड व उस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतले जात आहेत, या आंदोलानास मंगळवेढा तालक्यातील शेतरीवर्गामधून चांगला पाठींबा मिळत आहे याची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज बोराळे येथे स्वाभिमानी शेतकरी संघनेतर्फे व सर्व पंचक्रोशीतील शेतकऱ्यासमवेत बैठक घेतली या बैठकीला स्वाभिानीचे पच्शिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. राहुल घुले संबोधित करताना म्हणाले  की, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून ऊस उत्पादकांनी एकत्र येण्याचे गरज आहे. कारण गेली दोन वर्ष  कोरोना असल्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले नाही. त्यामुळे कारखानदारांनी सांगली कोल्हापूर पेक्षा  एक हजार रुपये ऊस दर कमी दिला. पण यंदा तुमच्या उसाला पहिली उचल 2500 तर अंतिम दर 3100 रूपये घेऊ फक्त शेतकऱ्यांनी पक्ष, पार्टी, गट बाजुला ठेवून ऊस दर जाहीर झाल्याशिवाय आपल्या ऊसाला तोड लावू नका असे आवाहन ॲड.घुले यांनी केले.

 यावेळी जिल्हा संघटक युवराज घुले माजी तालुकाप्रमुख अनिल बिराजदार, गणेश गावकरी, शंकर संगशेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संघटनेचे आबा खांडेकर, शांताप्पा कुंभार माजी सरपंच गणेश गावकरे, सरपंच विनोद पाटील, राष्ट्रवादीचे पिंटू पाटील, नानासाहेब भोजणे अरळी गावचे सरपंच मल्लिकार्जुन भांजे नंदुर गावचे तंटामुक्त समितीचे प्रमुख शंकर संगशेट्टी गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते..


test banner