महालिंगराया बिरोबाचं चांगभलं'च्या गजरात लाखो भाविकांच्या साक्षीने सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न ! सोहळ्यास आ.समाधान आवताडे यांची उपस्थिती! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०२२

महालिंगराया बिरोबाचं चांगभलं'च्या गजरात लाखो भाविकांच्या साक्षीने सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न ! सोहळ्यास आ.समाधान आवताडे यांची उपस्थिती!


हुलजंती यात्रेतील भाकणूकीत; राजकारणात पुन्हा उलतापालत व भरपूर पाऊस पाण्याची शक्यता ?
                                                         

मंगळवेढा(प्रतिनिधी) धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या तालुक्‍यातील हुलजंती येथील महालिंगराया व हुन्नूर बिरोबा या गुरू- शिष्यासह सात देवतांच्या पालख्यांचा भेटीच्या सोहळासाठी सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या भाकणुकीमध्ये एकमेकांचे फेटे फेकून दिल्यामुळे  राजकारणात उलथापालची शक्यता असून पाऊस पाणी उत्तम पण रोगराईची शक्यता असून त्यावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होणार असल्याची भाकणूक  वर्तवण्यात आले.

        कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष भाविकांच्या निर्बंधामुळे उत्साहाला मुरड घालावी लागली. हुलजंती येथील महालिंगराया बिरोबा सह सात पालख्याचा भेट सोहळा आज उत्साही वातावरणात उत्साहात रंगला. भंडारा, खोबरे व लोकरीची उधळण करत "महालिंगराया बिरोबाचं चांगभलं'च्या गजरात लाखो भाविकांच्या साक्षीने अभूतपूर्व सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.दोन वर्षांपूर्वी कर्नाटकातून आलेल्या भाविकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. यंदा जनजीवन पूर्ववत असल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा भरली.सोमवारी रात्री मुंडास बांधण्याचा सोहळा पार पडल्यानंतर आज बुधवार दुपारी  4 च्या सुमारास महालिंगराया मंदिरालगतच्या ओढ्यात महालिंगराया -बिरोबा या गुरू- शिष्यासह सात देवतांच्या पालखीचा भेटीचा सोहळा रंगला. महालिंगरायाच्या पालखीस शिरढोणचा बिरोबा- शिलवंती, बिज्जरगीचा बाळाप्पा, जिरअंकलगीचा बिरोबा, सोन्याळचा पांडुरंग- विठ्ठल यांनी भेट दिल्यानंतर महालिंगराया- बिरोबा या गुरू- शिष्याची भेट झाली.नगारा व ढोल वाजवत प्रत्येक पालखी महालिंगराया पालखीस भेट देत असताना "महालिंगराया बिरोबाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात आल्याने परिसर भंडाऱ्याने न्हाऊन निघाला. या भेटीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व गोवा आदी राज्यांतून सुमारे सात ते आठ लाखांहून अधिक भाविक खासगी वाहनाने दाखल होऊन याची देही याची डोळा सोहळा अनुभवला. महालिंगराया व बिरोबा या गुरू-शिष्यासह अन्य देवतांच्या भेटीच्या सोहळ्यानंतर मंदिर परिसरात भाकणूक झाली. या भाकणुकीकडे  सोलापूर व उंब्रजच्या भाकणुकीप्रमाणे येथील भाकणुकीलाही विशेष महत्त्व व लक्ष लागून राहिलेले असते.  


पोलिस प्रशासनाचे उत्तम नियोजन!

-----------

 मंगळवेढा आगाराच्या 11 बसेस तर बाहेरून 31 बसेस मागवून एकूण 42 एस.टी.बसेसचे नियोजन केले.तर कर्नाटकातून पाचशेपेक्षा अधिक बसेस व दहा हजारापेक्षा अधिक खाजगी वाहनाने कर्नाटक व महाराष्ट्रातील आठ लाखापेक्षा अधिक भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पो. नि. रणजित माने यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक व 13 पोलिस उपनिरीक्षक, 147 पोलिस कर्मचारी,1 दंगा काबु पथक,2 स्टॉकिंग फोर्स असा बंदोबस्त ठेवण्यात आला.

test banner