भटके विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी महायुतीच्या समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभे रहा - माजी आमदार नरेंद्र पवार - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

भटके विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी महायुतीच्या समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभे रहा - माजी आमदार नरेंद्र पवार

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक प्रचारार्थ नरेंद्र पवार यांचे आवाहन



पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघ ही भूमी संतांची आहे, या भागाचा प्रभावी विकास अजूनपर्यंत झालेला दिसत नाही. पंढरपूरच्या विकासासाठी व भटके विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी भाजपा व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले.

पंढरपूर येथे भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी संपन्न झालेल्या सभा व बैठकीत माजी आमदार नरेंद्र पवार बोलत होते.                     ही निवडणूक खऱ्या अर्थाने सामान्य माणसांच्या न्यायाची आहे, महाआघाडी सरकारने राज्यात सुरू केलेली वसुली असेल नाहीतर कृषी पंपांची वीज तोडणी असेल हे सामान्य माणसाला लुटण्याचे काम सुरू आहे. मंगळवेढा आणि पंढरपूर या शहराला वैभव मिळवून देण्यासाठी आणि ग्रामीण भागातल्या युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी डोळसपणे मतदान केलं पाहिजे. भटका विमुक्त समाज हा विखुरलेला समाज आहे म्हणून कोणीही लक्ष दिलेलं नाही, मात्र आता या सर्व घटकांचा विकास करण्याची जबाबदारी भाजपाने घेतली आहे. समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवून देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करा असे आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना केले.

यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, भाजपा भटके विमुक्त आघाडी युवामोर्चा संयोजक अमोल गायकवाड, पंचायत समिती उपसभापती राजश्री भोसले, तानाजी वाघमोडे, दीपक भोसले, भास्कर जाधव, भास्कर भाडगे, समाजसेवक  नागेश जाधव, उमेश जाधव,  ओंकार वाघमारे,  राहुल माने,  सुरेश माने, शशिकांत जाधव, पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती विक्रम शिरसाठ , माजी नगराध्यक्ष लक्ष्मण क्षीरसागर, पंचायत समिती सभापती लक्ष्मण धनवडे, माजी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, नगरसेवक इब्राईम बोरी, काशी कापडी समाज अध्यक्ष लाला पानकर, गवळी समाज युवा अध्यक्ष रोहित निसा, नगरसेवक जोजारी, वाल्मिकी सेना शहर अध्यक्ष अमोल ताढापुरके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

test banner