समाधान आवताडे यांच्या प्रचारर्थ पत्नी अंजलीताई आवताडे यांची 35 गावात झंझावत दौरा! दक्षिण भागात समाधान आवताडे चांगला प्रतिसाद - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

समाधान आवताडे यांच्या प्रचारर्थ पत्नी अंजलीताई आवताडे यांची 35 गावात झंझावत दौरा! दक्षिण भागात समाधान आवताडे चांगला प्रतिसाद

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी अशी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची ही पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले असून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे असून त्यांच्या विजयासाठी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांमध्ये त्यांच्या पत्नी अंजलीताई आवताडे यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक, नियोजनबद्धपद्धतीने होम टू होम प्रचारयंत्रणा राबवुन प्रचार करण्यास सुरुवात केलेली आहे.                         अंजलीताई आवताडे होम टू होम  प्रचारामध्ये माता भगिनींच्या अडचणी जाणून घेण्याबरोबर त्या त्या गावातील,वार्डातील समस्याही जाणून घेण्याचा मोठा प्रयत्न करताना त्या पाहावयास मिळत आहेत.

अंजलीताई आवताडे यांनी मंगळवेढ्याच्या 35 गावातील दुष्काळी भागातील या गावांना भेटी देऊन या गावातील पाणी प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक समजून घेऊन या पाणीप्रश्नाला सर्वात आधी प्राधान्य देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

     


अंजलीताई आवताडे या गावांमध्ये प्रचारासाठी येताच त्या गावातील महिला भगिनींकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येते.त्याचबरोबर त्या आल्यानंतर ज्या गावात प्रवेश करतात त्या गावातील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन अत्यंत नियोजनपद्धतीने पाच-पाच महिलांचा गट करून होम टु होम प्रचाराला सुरुवात करतात.अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या अंजलीताई आवताडे मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील महिला-भगिनींच्या आपलेपणाने चौकशी करत आहेत.एकंदरीत पाहता अंजलीताई आवताडे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या निमित्ताने पंढरपूर व 

मंगळवेढ्यातील जवळपास वाड्या-वस्त्या व गावठाण येथील महिला वर्गाची प्रत्यक्षरीत्या भेट घेऊन समाधान आवताडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

test banner