महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारादरम्यान जयंत पाटील यांचे वक्तव्य
मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राझंनी ( ता. पंढरपूर) येथे आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालक मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, भगिरथ भालके यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. भारत भालके यांचा कोरोना या संसर्ग जन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मृत्यू झाला आहे.भालके यांच्या निधनाने पोटनिवडणूक लागली आहे. तर दुसरीकडे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा देखील कोरोनामुळेच मृत्यू झाला आहे. असा अनुभव असल्याने राजकीय मंडळींनी कोरोनाबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यासाठी असलेले सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस कडून घेण्यात आलेल्या सभेला प्रचंड गर्दी करण्यात आली होती. त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे सॅनिटायझरची सोय नव्हती. अनेक कार्यकर्त्यांनी मास्कचा वापर केला नव्हता. असे असताना देखील मंत्रांनी कोरोना बाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र स्वतः च जयंत पाटील यांनी तुमचे चेहरे पहिल्या नंतर कोरोना जगात नाही असे वाटत आहे. यामुळे मास्क काढून बोलतोय असे वक्तव्य केले. यामुळे महा विकास आघाडीचे सरकार धोरणाबाबत अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे