भारतनानां नी पाहिलेले स्वप्न "भगीरथ" पुर्ण करणार-जयंत पाटील - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ४ एप्रिल, २०२१

भारतनानां नी पाहिलेले स्वप्न "भगीरथ" पुर्ण करणार-जयंत पाटील


मंगळवेढा(प्रतिनिधी) भारतनानांनी पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघासाठी अनेक स्वप्नं पाहिली होती. ती स्वप्न भारतनानांचा भगीरथच पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी व्यसपिठावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, उमेदवार भगीरथ भालके, निरीक्षक सुरेश घुले, दीपक साळुंके-पाटील, गणेश पाटील, पश्चिम महाराष्ट्र ओबीसीचे प्रभारी लतीफ तांबोळी नगराध्यक्षा अरुणा माळी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना म्हणाले 'पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघात वातावरण सकारात्मक आहे, आघाडीचा विजय निश्चित आहे. भारत नानांनी उभारलेल्या अविरत कार्यामुळे जनता भगीरथ भालके यांना मतरुपी आशीर्वाद देणार हा विश्वास आहे'                                  

'पंढरपूर-मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. जवळपास १२ वर्षाहून अधिक काळ महात्मा बसवेश्वर मंगळवेढ्यात राहिले. त्यामुळे महात्मा बसवेश्वर महाराज यांचे स्मारक व्हावे ही भारतनानांची मागणी होती. लोकांच्या भक्ती भावनांचा आदर करत यावर्षीच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या स्मारकाची तरतूदही केली आहे'

भारतनाना माझ्याकडे २४ गावांच्या पाण्याचा प्रश्न घेऊन आले होते. भाजपा सरकारच्या काळात या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र आपले सरकार येताच अधिकाऱ्यांच्या बैठका लावून या गावांना २ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.       

 राष्ट्रवादीचे प्रदेशध्याक्ष जयंत पाटील यांचे स्वागत करताना पक्षनेते अजित जगताप सोबत न.पा बाधंकाम सभापती प्रविण खवतोडे   

test banner