केंद्र व राज्य सरकारला धडा शिकवण्याची संधी-राजु शेट्टी - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ४ एप्रिल, २०२१

केंद्र व राज्य सरकारला धडा शिकवण्याची संधी-राजु शेट्टी

 


मंगळवेढा(महादेव धोत्रे)  ज्या लोकांनी शेतकऱ्यांचे करोडो रुपये बुडवले. अशा लोकांकडे निवडणुका लढवण्यासाठी पैसा आहे. या निवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार आहे. अश्या उमेदवारांचा काटा काढून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा उमदेवारास संधी द्यावी असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. खा. राजू शेटटी यांनी तालुक्यातील अरळी येथे बोलताना व्यक्त केले.                                    

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीच्या निमिताने ते मंगळवेढा प्रचार दौऱ्यावर आले असता ते बोलत होते.            यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष युवा-आघाडी अॅड.राहुल घुले,जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, तानाजी बागल, विष्णुपंत बागल, रणजित बागल, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, शहराध्यक्ष हर्षद डोरले,अनिल बिराजदार,शंकर संगशेट्टी,अनिल अंजुटगी,आप्पसाहेब पाटील, सिद्धाराम व्हनुट्टगी, बाळासाहेब कपले उपस्थितीत होते.                                                 पुढे राजु शेट्टी म्हणाले शेतकऱ्यांना कर्ज झाले तरी त्यांचा तोंड लपवावे लागते.नाहीतर खर्चात काटकसर करावी लागते.इथे मात्र शेतकऱ्यांच्या एफ आर पी ची रक्कम थकवून उमेदवाराच्या खर्चात मात्र काटकसर नाही.शेतकऱ्यांच्या एफ आर पी ची कोट्यावधी रक्कम थकवून निवडणूक खर्चासाठीचे दोन्ही पक्षाच्या उमेदवाराकडे आहेत पाच वर्षे पैसे गोळा करायचे आणि ते पैसे निवडणूकीवर खर्च करायचे अशाचा काटा काढायची संधी देखील पोटनिवडणूकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाली असून 

शेतकऱ्यांवरील अन्यायावर हे पक्षीय उमेदवार रस्त्यावर उतरले नाहीत तर पहिल्यांदा रस्त्यावर उतरण्याचे काम स्वाभीमानी शेतकरी संघटनेने केेले.आता मी एकटा कुठे कुठे पळणार यासाठी शेतकऱ्यांची फौज तयार केल्याशिवाय पर्याय नाही.    शिरोळच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून देशाला शेतकरी नेता मिळाला.एखादे भामटं निघाले म्हणून सगळेच भामटे निघत नाहीत असा आरोप नाव न घेता सदाभाऊ खोत यांच्या करत आपला प्रयत्न सोडायचा नाही आपण वर्गणी देवून निवडणून दिलेल्या उमेदवारांनी काम न केल्यास त्यांचा शर्ट काढायला तुमच्याबरोबर मी पुढे असणार आहे.दामाजी कारखान्यातील सभासदाची मालकी हक्क रदद करुन कारखाना खिशात घालायचा प्रयत्न होत असेल त्याचा जाब विचारण्याची धमक स्वाभीमानीच्या उमेदवारात आहेत.दरोडेखोर लाखो रुपये लुटत असताना साखर कारखानदार मात्र कोटयावधी रुपयाचा दिवसा दरोडा टाकत असून अशा  उमेदवाराचा काटा काढावा.जेवण व दारुवर बळी पडू  नका केंद्र व राज्यातील सरकारला धडा शिकवण्याची संधी आहेे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत आली आहे.    त्या शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेने न्याय दिला आहे. पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील प्रमुख दोन उमेदवार साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. साखर आयुक्तांवर दबाव आणून आम्ही त्या दोघांवर महसुली थकबाकीची आरआरसी दाखल करायला भाग पाडले आहे. मात्र आजही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. ज्या लोकांनी शेतकऱ्यांचे करोडो रुपये पैसे बुडवले आहेत. याचा राग व्यक्त करायला शेतकऱ्यांना संधी द्यायच्या उद्देशाने उमेदवार उभा केला आहे. त्याचबरोबर शहरी व ग्रामीण भागातील वीजबील माफ करावे यासाठी आंदोलन करत होतो.


१ महिन्याला १०० युनिट प्रमाणे तीन महिन्याचे वीजबिल माफ करण्यासाठी फक्त ३ हजार कोटींची तरतुद लागत होती. महाविकास आघाडींच्या नेत्यांना भेटलो. १ कोटी २५ लाख कुटुंबांना त्याचा फायदा झाला असता. दिल्ली, करेळ सरकारने घरगुती वीजबील माफ केले. तर महाराष्ट्र सरकारने का केले नाी. कमीत कमी १५०० कोटींचे पॅकेज दिले असते तर महाराष्ट्रातील जनतेला फायदा झाला असता असे राजू शेट्टी यांनी सांगितले.                                                      चौकट:-  दामाजी कारखान्याकडे 46 कोटी तर विठ्ठल कडे 40 कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकीत बिले असून आवताडे हा साप तर भगीरथ भालके विंचू आहे. या साप विंचू काट्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांचा रात्री आधार म्हणजे बॕटरी असून आपल्या उमेदवाराचे चिन्ह हे बॕटरी आहे. या शेतकऱ्यांच्या विश्वास असणाऱ्या बॕटरीला मतदान करण्याचे राजु शेट्टी यांने केले अहवान!

test banner