राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी महिला सरसावल्या! डॉ.प्रणिताताई भालके यांच्या नेतृत्वाखाली होम टू होम प्रचाराला चांगला प्रतिसाद - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी महिला सरसावल्या! डॉ.प्रणिताताई भालके यांच्या नेतृत्वाखाली होम टू होम प्रचाराला चांगला प्रतिसाद

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर होऊ घातलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा शहरात होम टू होम भेटीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.                                                                          स्व.आ.भारत नानांच्या सुनबाई  डॉ.प्रणिताताई भालके व प्रांजलीताई शेखर भालके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांचे पदाधिकारी यांच्या समवेत मंगळवेढा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचारार्थ संत दामाजी नगर,संत चोखामेळा नगर व शहरातील प्रभागात होम टू होम जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन भगीरथ दादांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.                                                                                                     यावेळी माताभगिनी नानांची आठवण सांगून डोळ्यातील अश्रूना वाट मोकळी करून देत आहेत.नाना म्हणजे गोरगरिबांचा वाली होता असे निक्षून सांगतायेत.नानांच्या जाण्याने आम्हाला आमच्या घरातील च माणूस गेला आहे असे पोटतिडकीने सांगत आहेत.या प्रचारावेळी अनेकांनी नानांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. या प्रचार दौऱ्याला जनतेतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सौ.संगीता कट्टे पाटील,नगराध्यक्षा अरुणा माळी, माजी नगराध्यक्षा अरुणा दत्तू,जेष्ट नगरसेविका भागीरथी नागणे,प्रा.सुप्रिया जगताप,,नगरसेविका राजश्री टाकणे, स्वाती गवळी,मोनाली नाईकवाडी,मंदाकिनी सावंजी,लता माळी,भाग्यश्री माळी, स्मिता अवघडे,सुनीता मेटकरी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रज्वल शिंदे,शहराध्यक्ष संदीप बुरकुल,चंद्रकांत काकडे,राहुल वाकडे,विशाल आयवळे,अजित यादव,किरण घोडके,विक्रम शेंबडे,ज्ञानेश्वर गोवे उपस्थित होते.

test banner