"शेतकऱ्यांनो जागे व्हा.साखर कारखानदारांच्या भूलथापांना बळी पडू नका-प्रभाकर देशमुख - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

"शेतकऱ्यांनो जागे व्हा.साखर कारखानदारांच्या भूलथापांना बळी पडू नका-प्रभाकर देशमुख

 


मंगळवेढा(प्रतिनिधी)पंढरपूर मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यानो जागे व्हा.त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन प्रभाकर देशमुख. यांनी खर्डी येथील ग्रामस्थाना केले.

आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर ऊस उत्पादक शेतकरी आहेत याचाळीस हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साठी भांडणाऱ्या अंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या उपोषणाला मोजून दहा ऊस उत्पादक होते.अशी दयनीय अवस्था आहे. याचे कारण कारखानदारानी ऊसबील अडवले तर कसं?अस म्हणणाऱ्या शेतकऱ्यानो जागे व्हा.

  साखर कारखाना चेअरमन गावात आला तर त्याला ऊसबील बाबत जाब विचारा तरच हे कारखानदार ताळ्यावर येतील.जनतेची प्रश्न तळमळीने सोडवण्यासाठी झटणाऱ्या एक महिला उमेदवार सौ.शैलाताई गोडसे या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विविध प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी एकवेळ. संधी द्यावी. महिला असूनही त्या जनतेच्या कल्याणासाठी धडपडत आहेत.

 भगिरथ भालके तसेच समाधान आवताडे यांनी शेतकऱ्यांसाठी दोन्ही तालुक्यातील पाणीप्रश्न बाबतीत किती अंदोलने केली आहेत. कोट्यावधी रुपयाच्या गाडीतून फिरणाऱ्या या नेत्यांना जनतेशी काही घेणेदेणे नाही. अशा आपल्याच धुंदीत राहणाऱ्या या नेत्यांची धुंदी शैलाताई गोडसे या उतरवल्या शिवाय रहाणार नाही. येत्या१७तारखेला शैलाताई गोडसे यांच्या शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन प्रभाकर भैय्या देशमुख यांनी खर्डी येथील प्रचार सभेत केले.

test banner