पंढरपूर शहर व 22 गावांसाठी एक तर योजना आणली का? - आ.प्रशांत परिचारक  - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

पंढरपूर शहर व 22 गावांसाठी एक तर योजना आणली का? - आ.प्रशांत परिचारक 

 


पंढरपूर (प्रतिनिधी) मंगळवेढा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक येथील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ कौठाळी, गादेगाव या गावात सभा झाली या सभेला गावातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या भाषणात विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना लक्ष्य केले.

भारतात त्यांनी अकरा वर्षात मंगळवेढ्याच्या 35 गावांच्या पाणी प्रश्नावर राजकारण केले विठ्ठल कारखाना आणि संत दामाजी साखर कारखान्यावर राजकारण केले, अर्बन बँकेला तोड देण्यासाठी सोलापूरातील बंद पडलेली अर्जुन बँक घेतली विठ्ठलच्या प्रत्येक  सभासदांकडून तीन ते पाच हजारापर्यंत शेअर्स गोळा केले , आज कुठे आहे ती बँक? मंगळवेढ्याच्या पाण्याचा विषय तर सोडाच मात्र पंढरपूर शहर आणि 22 गावांसाठी एक तरी योजना भालके यांनी आणली का? त्यांनी सांगावं इथेच राजकारण सोडेन आणि बिनशर्त पाठिंबा देईल. नगरविकास उत्थानमधून निधी आणला, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणला, घाण पाणी शुद्धीकरण प्रकल्प आणला, चार हजार बेघर लोकांना घरे बांधण्याचे काम सुरू झाले त्याचा निधी आम्हीच आणला, हे सर्व प्रकल्प आणि निधी हा भाजप सरकारच्या काळात आणला असल्याचे परिचारक यांनी सांगितले.


दीपक भोसले म्हणाले, मागील अकरा वर्ष भालके यांनी लबाडीने काम केले, पोरगा पण कमी नाही, बापानं अर्जुन बँक काढून दिली होती, त्याचे शेअर्स घेतले  पण आज बँक कुठे आहे दिसत नाही, बाराला उठायचे टाईमपास करायचा... संपला दिवस, जिल्हा परिषदेला उभारला पण लोकांनी स्वीकारले नाही, पडला आणि आता आमदारकी लढवतोय, बापाच्या वेशात मते मागतोय,सहानुभूती दाखवू नका, विकासाचा दृष्टीकोन ठेवून भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली, कारखाना चांगला चालवणारा, हजारोंना काम देणाऱ्या आवताडे यांना विजयी करा असे आवाहन केले

या प्रचारदौऱ्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे,पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे,सभापती अर्चना व्हरगर,उपसभापती राजश्री पंडितराव भोसले,गादेगाव सरपंच ज्योतीताई बाबर, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे ,जिल्हा परिषद सदस्य,पांडुरंग कारखान्याचे व्हा. चेअरमन वसंतनाना देशमुख, जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब गोसावी,भाजप नेते बी.पी.रोंगे,बाळासाहेब देशमुख,पांडुरंग संचालक सुरेश आगवणे,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली हळणवर,दाजी पाटील,व त्या त्या गावचे पाटील, सरपंच, चेअरमन व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

test banner