भारत नानांच्या विकास व्रताची जबाबदारी जनता भगीरथ दादांवर सोपवणार ! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २ डिसेंबर, २०२०

भारत नानांच्या विकास व्रताची जबाबदारी जनता भगीरथ दादांवर सोपवणार !



लोकप्रिय आमदार भारत नाना यांचं जाणे मतदार संघातील जनतेसाठी खूप क्लेशकारक आहे. आपल्या हाकेला कधीही धावून येणारा, अडचणी ऐकून घेवून त्या सोडवणारा आपला माणूस नाही या कल्पनेनेच बर्‍याच कष्टकरी जनतेचे काळीज पिळवटून निघाले आहे. 

भारतनानांनी आमदारपणाचा आव न आणता सामान्याशी थेट संवाद साधला. मतदार संघातील प्रत्येक खेड्यात त्यांचा वावर अगदी सहज होता. लोक अडचणी थेट भेटून ,फोन करून  सांगत होते आणि तात्काळ प्रश्न मार्गी लागत होते. त्यांचा फोन कायम रीचेबल असायचा. मोठा पुढारी असो किंवा एखादा शेतकरी प्रत्येकाला समान न्याय देणारा आमदार अशीच त्यांची ख्याती लोकांच्या मनात होती. “जनताच माझा पक्ष आहे” असा ठणकावून सांगत सलग तीन वेळा आमदार होण्याची किमया साधली होती.

           मागील १२ वर्षात त्यांनी आडवा आडवी च घाणेरडे राजकारण मोडीत काढले. दोन्ही तालुक्यात त्यांच्या तालमीत युवा पिढीचे नगरसेवक, सरपंच, संचालक असे नवे राजकरणी तयार केले आहेत. एवढेच नव्हे तर ज्या जेष्ठ राजकारण्याला आधीच्या पुढार्‍यांनी अडगळ ठरवले होते त्यांना नानांनी सन्मानाने सोबत घेतले अशी जुन्या नव्या राजकारणाचा वेगळाच पॅटर्न त्यांनी दोन्ही तालुक्यात यशस्वी राबवला होता. ही त्यांची लोकांना आपलेसे करण्याची त्यांची पद्धत नेहमीच लोकांच्या लक्षात राहण्यासारखीच आहे. 

    ३५ गाव पाण्याचा प्रश्न हा मतदार संघातील सर्वात प्रलंबित आणि राजकीय मुद्दा पहिल्या टर्मला पिण्याचे पाणी आणून निम्मा निकालात काढला. ज्या प्रश्नावर मागील ४० वर्षात फक्त राजकारणच झाले होते. त्यामुळे त्या भागातील स्त्रियांच्या डोक्यावरचा हंडा आणि पायपीट कायमची संपवली. आज त्यांच्या जाण्याने डोळ्यात पाणीच पाणी आहे. कारण महिलांना सन्मान देणारा आमदार म्हणून त्यांच्या मनात नानाच स्थान अढळ आहे. 

कुठल्याही प्रश्नाच्या मुळाशी जावून त्याचा निकाल लावायचा तोही अगदी रांगड्या स्टाईलने हे त्यांच वैशिष्ट्य पुढील काळात तीव्रपणे भासणार आहे. नानांच्यानंतर भगीरथदादा त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या विकास कामाला पूर्ण करतीलज अशी इच्छा जनतेतून व्यक्त होत आहे. मागील निवडणुकांमध्ये भगीरथ दादानी युवक कार्यकर्त्यांची चांगली टीम बनवून नेतृत्व गुण दाखवले आहे . कारखाना संचालकपद ही सांभाळून आहेत.  सक्रिय राजकारणाचा एक भाग यशस्वी सांभाळून समाजकारण केले आहे. लोकहित आणि जनसंपर्क हे गुण नांनाकडूनच आले असल्यामुळे  लोकांच्या सर्व आशा आता भगीरथ दादांकडे लागल्या आहेत. दादांच्या रूपात लोक आता नानांना पाहत आहेत. असा एकंदर सुर नागरिकांमधून येत आहे. 

   व्यंकट आण्णा सारखा नानाच्या तालमीत तयार झालेला कसदार नेता. राजकीय डावपेचात निपुण आहेत. नानांचे अपूर्ण राहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यास कुठलीच कसर सोडणार नाही. तेही भगिरथ दादांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहतील.

एवढ्या वर्षात भारतनानांनी उभा केलेली माणसे आणि त्याचे प्रेम हीच त्यांची मोठी संपत्ती आहे. ती कधीही त्यांचा विचार रूपी वावर आपल्यातून संपू देणार नाहीत असेच या समयी वाटते. येणार्‍या काळात बर्‍याच गोष्टीचे संदर्भ बदलतील पण जनतेच्या मनात नानांनी केलेली जागा अढळ राहील यात शंका नाही. ईश्वर अश्या लोकनेत्याला चिरशांती देवो हीच श्रद्धांजली.

test banner