आधीच आमचं ठरलंय यंदा निवडणूक गनिमी काव्याने लढायचं-समाधानआवताडे उद्या अपक्ष दाखल करणार - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

आधीच आमचं ठरलंय यंदा निवडणूक गनिमी काव्याने लढायचं-समाधानआवताडे उद्या अपक्ष दाखल करणार

   
                                                              मंगळवेढा(प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आधीच  आमचं ठरलंय यंदा निवडणूक गनिमी काव्याने लढायचं असं म्हणत उद्या अपक्ष दाखल करणार असल्याचे मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनात बोलताना व्यक्त केले.               व्यासपीठावर समाज कल्याण समितीच्या सभापती शिलाताई शिवशरण,पं.स.सभापती प्रदिप खांडेकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,दामाजीचे व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी,विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक शेखर भोसले,इराप्पा पुजारी,सचिन शिवशरण,चंद्रकांत घुले,राजीव बाबर,एकनाथ जगताप,बिभीषण बेदरे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.
 गत विधानसभा निवडणुकीत कोणतीही संस्था ताब्यात नसताना शिवसेनेतून ४३ हजार  इतके मतदार मतदान घेतलेल्या समाधान आवताडे यांनी अलीकडच्या पाच वर्षात दोन साखर कारखाने,सूतगिरणी, पंचायत समिती व जिल्हा परिषद, व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुक्यात आपले राजकीय बस्तान बऱ्यापैकी बसवले असताना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले परंतु भाजप आणि शिवसेना या युतीमध्येही जागा रयत क्रांती संघटनेला देण्यात आली. त्यामुळे आवताडे यांच्यासमोर एकतर माघार घेणे अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणे हा पर्याय समोर होता परंतु यावर काय करावे यासाठी विचारविनिमय करण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढ्यातील कार्यकर्त्यांची बैठक मंगळवेढ्यात घेतली या बैठकीत दोन्ही तालुक्यातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये उपस्थित मान्यवरांनी भाषणातून तालुक्याच्या विकासासाठी निवडणूक निवडणूक लढली पाहिजे असा आग्रह झाला आहे यावेळी बोलताना अध्यक्ष समाधान पाच वर्षापुर्वी निवडणूक लढवताना मंगळवेढ्यातील समस्या माहीत होत्या परंतु पंढरपुरातील प्रश्न समस्या माहित नव्हत्या परंतु या पाच वर्षांमध्ये मी दोन्ही तालुक्यातील प्रश्न प्रश्नाचा अभ्यास केला आहे या दोन्ही तालुक्यांमध्ये बेरोजगारीची समस्या वाढत आहे वाढत्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी व तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नाला न्याय पडण्यासाठी आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून उपस्थितांना ही निवडणूक लढवावी का अशी विचारणा केली असता उपस्थितांनी हात वर केले हात वर केल्यानंतर मग आपलं आतापासून ठरलंय उद्या अर्ज दाखल करायचं करण्याचा संदेश कार्यकर्ता दिला पाटील रोज माझ्यासाठी आठ तास काम करत आहात फक्त दोन तास वाढवा आपणाला विजय दूर नाही उपस्थित सर्वानी  एकत्रित प्रयत्न केल्यानंतर आपल्या अंगावर गुलाल पडण्यास वेळ लागणार नसल्याचा संदेश यावेळी बोलताना दिला.                                   यावेळी येताळा भगत,दत्तात्रय जमदाडे,अॅड.दत्तात्रय तोडकरी, सत्यवान रोंगे,अमित यादव,पैलवान औदुंबर शिंदे, विनोद लटके,प्रा.संतोष मिसाळ, भुजंगराव पाटील,भारत निकम,शेखर भोसले,आदींनी मनोगत व्यक्त केले.  सुत्रसंचालन दिगंबर यादव यांनी तर आभार बळीराम बाबर यांनी मानले.     
test banner