मोहिते-पाटीलांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

संवाद न्यूज चॅनेल लवकरच

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

मोहिते-पाटीलांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी

       
                                                                      सोलापूर (प्रतिनिधी )माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे काम केले.तसेच त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते यांनी भाजपची वाट पकडली.
दरम्यान आता शरद पवार यांनी मोहिते पाटील यांना धडा शिकवण्यासाठी जोरदार खेळी केली आहे.                  त्यासाठी भाजपच्या निकटवर्तीय नेत्याला पवारांनी राष्ट्रवादीत खेचले आहे.राष्ट्रवादीने उत्तमराव जानकर यांना माळशिरस मधून उमेदवारी दिली आहे.उत्तमराव जानकर भाजपमधून निवडणूक लढवू इच्छित होते.तसेच ते भाजपचे निकटवर्तीय नेते मानले जातात.शिवाय ते धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात.त्यामुळे हा मोहिते पाटील तसेच भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.