मंगळवेढा (प्रतिनिधी)पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार व दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या विकासात्मक प्रचारामध्ये त्यांची पत्नी अंजली अवताडे व संजय आवताडे यांच्या पत्नी सुकेशनी आवताडे व त्यांच्या सहकारी महिलांनी पंढरपूर तालुक्यातील 22 गावे व शहरांमध्ये जोरदार प्रचार यंत्रणा राबविली असून मतदारांच्या घरोघरी जाऊन समाधान आवताडे यांचे पुढील पाच वर्षाच्या विकासाचे व्हिजन सांगून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.
काल संतपेठ,इसबावी,उत्पातगल्ली,बडवे गल्ली सह शहरात मंगळवेढा पंचायत समिती सदस्य उज्वलाताई मस्के, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शीला शिवशरण, जिल्हा परिषद सदस्य मंजुळा कोळेकर,मंगळवेढा पंचायत समितीच्या उपसभापती विमल पाटील, दामाजीनगरच्या सरपंच अंजली शिंदे, रतन पडवळे, स्वाती मोहिते, दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका कविता निकम,स्मिता म्हमाणे,सुनीताताई पवार, संगीता यादव ,डॉक्टर वृषाली पाटील या महिला सध्या समाधान आवताडे यांच्या प्रचाराकरिता पंढरपूर शहर व तालुक्यातील 22 गावांमधील घर ना घर पिंजून काढत मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.
यावेळी या महिलांकडून मतदारांना आतापर्यंत समाधान आवताडे यांनी सामान्य लोकांसाठी केलेले कार्य केलेली मदत याची माहिती पटवून देत आहेत तर पुढील पाच वर्षात मतदारसंघांमध्ये काय विकास करणार?तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांचे काय व्हिजन आहे याची माहिती देत मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत या महिलांच्या प्रचाररॅलीला पंढरपूरमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे .