युटोपियन शुगर्स कामगार कल्याण व महिला मंडळ आयोजित दांडिया/गरबा स्पर्धेत ग्रुप गटातून सुजाता कोंडूभैरी तर डूएट गटातून रूपाली कलुबर्मे विजेते - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

युटोपियन शुगर्स कामगार कल्याण व महिला मंडळ आयोजित दांडिया/गरबा स्पर्धेत ग्रुप गटातून सुजाता कोंडूभैरी तर डूएट गटातून रूपाली कलुबर्मे विजेते


                                                                मंगळवेढा(प्रतिनिधी )युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील कामगार कल्याण व महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित दांडिया/गरबा स्पर्धा २०१९ या शनिवार दिनांक १२/१०/२०१९ रोजी श्रीराम मंगल कार्यालय मंगळवेढा येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषमयी वातावरणात पार पडल्या.सदरच्या स्पर्धेत सामूहिक ग्रुप गटातून सुजाता कोंडूभैरी व ड्यूएट गटातून रूपाली कलुबर्मे विजेते ठरले तसेच उत्तेजनार्थ-१ कल्पतरू ग्रुप, उत्तेजनार्थ-२ दामाजी ग्रुप हे संघ विजयी झाले.
         प्रारंभी,कार्यक्रमाची सुरुवात सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे, सौ.सीमाताई प्रशांत परिचारक,सौ.विनयाताई उमेश परिचारक, डॉ.सौ.प्रीती शिर्के, सौ.विद्या देसाई व सौ.सुवर्णा फाळके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व तुळजाभवानी देवी च्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी सिनेअभिनेत्री तेजा देवकर,सिने अभिनेता केतन पेंडसे आदि मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. सौ.प्रीती शिर्के यांनी केले या वेळी बोलताना सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे म्हणाल्या  की, युटोपियन शुगर्स कामगार कल्याण व महिला मंडळ आयोजित दांडिया/गरबा हा कार्यक्रम हा  अतिशय चांगला व लोकप्रिय उपक्रम असून महिलांना त्यांच्यातील गुणांना वाव देण्यासाठी युटोपियन शुगर्स कामगार कल्याण व महिला मंडळ यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले  आहे. तसेच या ठिकाण चे सर्व स्पर्धक व रसिक श्रोते यांचा प्रतिसाद बघुन मी खूपच भारावून गेलेले आहे.
सदरच्या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
सामूहिक ग्रुप :- सुजाता कोंडूभैरी प्रथम क्रमांक., ,सुपर वूमन-ग्रुप द्वितीय ,मोरया ग्रुप तृतीय, तसेच ड्यूएट गटातून प्रथम रूपाली कलुबर्मे, द्वितीय गोल्डन ग्रुप तर तृतीय युटोपियन कॉलनी ग्रुप  हे संघ विजयी झाले.
      आकर्षक पारंपरिक पोषाखात संगीताच्या तालावर मंत्रमुग्ध होऊन,मनमोकळे पणाने थिरकणारे दांडिया प्रेमी असे दृश्य काल श्रीराम मंगल कार्यालय येथे पाहावयास मिळाले. मंगळवेढयामध्ये अशा प्रकारच्या भव्य व नियोजनबद्ध दांडिया स्पर्धा आयोजित करून मुख्यप्रायोजक युटोपियन शुगर्स ने उपस्थितांची दाद मिळविली.आयोजनामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही यांची दक्षता युटोपियन प्रशासन घेत होते. पिण्याच्या पाण्यापासून ते स्वागत करताना देण्यात येणार्‍या खाऊ व भेट वस्तु ते टाकाऊ पदार्थ टाकण्याची व्यवस्था आदीपर्यंत काळजीपूर्वक हाताळताना दिसत होते. उच्च दर्जाची साऊंड सिस्टिम आणि लाईव्ह स्क्रीन या मुळे गर्दीने तुडुंब भरलेल्या सर्व महिला प्रेक्षकांना कार्यक्रम सहजपणे पाहता आला. निवेदिका श्वेता हुल्ले यांनी प्रश्न मंजूषा या कार्यक्रमातून अनेकांना प्रश्न विचारून मनोरंजना बरोबरच भरघोस बक्षिसे दिली तसेच आपल्या खास शैलीने महिला प्रेक्षकांना सतत हलवत,झुलवत ठेवले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वच महिलांनी कारखान्याचे मार्गदर्शक व आमदार  प्रशांतराव परिचारक व चेअरमन उमेश परिचारक तसेच कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचे मंगळवेढेकरांनी आभार मानले. व पुढील कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल विनंती केली. सदर स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी सौ.आशा प्रदीप मर्दा व सौ.भुतडा,पंढरपूर यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.विजेत्या स्पर्धकांना विविध पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सदरच्या स्पर्धेचे हे दुसरे यशस्वी वर्ष होते.प्रश्न मंजूषा कार्यक्रमातील विजेत्यांना धनलक्ष्मी ज्वेलर्स, सिद्धनाथ ज्वेलर्स,शिवशंभो कलेक्शन,वाघमारे स्टील फर्निचर,घाडगे कलेक्शन, आर्यास मेक अप स्टुडिओ, साई मोबाइल गॅलरी, रामकृष्ण ट्रेडर्स, श्री भैरवनाथ भांडी सेंटर, माणिक भांडी स्टोअर्स, शांतिनिकेतन कलेक्शन,साई पेट्रोलियम अँड रिलायन्स सर्व्हिसेस आदीं कडून आकर्षक बक्षिसे देण्यात आले.
फोटो ओळी:- १)युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील कामगार कल्याण व महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित दांडिया/गरबा स्पर्धा २०१९ या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करताना सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे, सौ.सीमाताई प्रशांत परिचारक,सौ.विनयाताई उमेश परिचारक, डॉ.सौ.प्रीती शिर्के, सौ.विद्या देसाई व सौ.सुवर्णा फाळके २)खास रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी नृत्यावर ठेका धरला. ३) सुजाता कोंडूभैरी ग्रुप या विजयी संघाला प्रथम क्रमांकाचे परितोषिक देताना सिने अभिनेते केतन पेंडसे,सिने अभिनेत्री तेजा देवकर, सौ.विद्या देसाई व सौ.सुवर्णा फाळके  रूपाली काळुंगे आदि मान्यवर दिसत आहे.
test banner