दक्षिण काशी म्हणून ओळख असणा-या पंढरपूरचा विकास करणार : समाधान आवताडे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

दक्षिण काशी म्हणून ओळख असणा-या पंढरपूरचा विकास करणार : समाधान आवताडे

पंढरपूर(प्रतिनिधी) जेंव्हा नव्हते चराचर तेंव्हा होते पंढरपूर…जेंव्हा नव्हती गोदा-गंगा.. तेंव्हा होती चंद्रभागा. असा क्षेत्र महिमा असणारे पंढरपूर नगरीस भूलोकीचे वैकुंठही म्हटले जाते. देवभूमी पंढरपूर आणि संतभूमी मंगळवेढा यांचे अतूट असे नाते आहे. पंढरपूर ला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून येथे वारकरी येथे येतात. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी मी पंढरपूरच्या विकासासाठी कटीबद्द असून पंढरपूर तीर्थक्षेत्राला महाराष्ट्राला हेवा वाटावा असा विकास करेन अशी ग्वाही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले. ते पंढरपूर येथे शिवतीर्थावर आयोजीत प्रचारसभेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, पंढरपूर तिर्थक्षेत्राचा शिर्डी,शेगावच्या धर्तीवर विकास करण्यास मी कटिबध्द राहणार आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याला व नांदेडच्या गुरुव्दारासाठी ज्याप्रमाणे केंद्राकडून निधी मिळतो त्याच धर्तीवर इथेही निधी आणण्यास मी कमी पडणार नाही.  पंढरपूर शहर व तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासाठी पंढरपूरला औद्योगीक वसाहत उभी करुन रोजगार निर्मीती करणार आहे। गोपाळकाला गोड झाला म्हणत भावीक गोपाळपूरला येतात. गोपाळपूरचा विकास होणेही गरजेचे आहे. यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शासन दरबारी प्रयत्न करुन पंढरपूरला स्वतंत्र संत विद्यापीठ करणार आहे. पंढरपूर तालुक्यातील शेतक-यांच्या अनेक अडचणी आहेत. उजनी व निरा-भाटघरचे पाणी वेळेवर मिळत नाही. पाण्याच्या प्रत्येक पाळीसाठी रस्त्यावर उतरावे लागते. लोकप्रतिनिधींच्या नियोजनशुन्य कारभारामुळे जनतेवर ही वेळ आली आहे. शेतकरी बांधवांना पाण्याची आवर्तने वेळेत मिळवून देणार आहे. पुरुषांच्या खांदयाला खांदा लावून महिला भगिनी काम करतात. चांगले काम करण्याची त्यांची प्रबळ इच्छा असते, अशा महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मी कटिबध्द असणार आहे. अनेक शेतकरी बांधव पिक विम्यापासून वंचीत आहे. त्यांच्यासाठी कुणी आवाज उठविला नाही. केवळ आश्वासनाचा पाऊस पाडायचा. जनतेला भूलवत,झुलवत ठेवायचे अशाच पध्दतीचे राजकारण केले गेले आहे. ज्या वयात विश्रांतीची गरज आहे अशा वयात जनतेच्या अडचणी सोडविण्याची कुवत त्यांचेकडे आहे का हा खरा प्रश्न आहे. आज याठिकाणी पाऊसानेही माझे स्वागत केले. हा शुभशकुन समजतो. पाऊस तर पडूद्या मशागत करायला आपला ट्रॅक्टर तयार आहे. एक वेळ संधी द्या संधीचे सोने केल्याशिवाय रहाणार नाही. यामध्ये मी जर कमी पडलो तर पुढच्या वेळी तुमच्याकडे येणार नाही. बोलण्यापेक्षा काम करण्यावर माझा जास्त विश्वास आहे. यासाठीच राजकारणाची मशागत करुया आणि परिवर्तन करुया असे आवाहन उमेदवार समाधान आवताडे यांनी केले.
या प्रचार सभेला प्रचंड अशी गर्दी झाली होती. या सभेमध्ये विनोद लटके, औदुंबर शिंदे वस्ताद, डॉ.वृषाली पाटील, विठठल कारखाण्याचे मा.संचालक शेखर भोसले, दत्तात्रय जमदाडे, आदिनी मनोगत व्यक्त केले. सभेसाठी डी.सी.सी. बँकेचे व्हा.चेअरमन व जेष्ठ नेते बबनराव आवताडे,समाजकल्याण सभापती शैला शिवशरण, व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी,अंजलीताई आवताडे,संचालीका स्मिता म्हमाणे, कविता निकम,नगरसेवीका रतन पडवळे,प्रा.येताळा भगत, दत्तात्रय जमदाडे, मार्केट कमेटीचे सभापती सोमनाथ आवताडे,संभाजी ब्रिगेड,पंढरपूर शहराध्यक्ष लखन थिटे, अँड सागर आटकळे,सामाजीक कार्यकर्ते संजय[बाबा]बारसकर,मंगेश क्षिरसागर, दामाजी कारखान्याचे संचालक राजेंद्र सुरवसे,चंद्रकांत पडवळे, खंडू खंदारे,रामकृष्ण चव्हाण, बसवेश्वर पाटील, सचिन शिवशरण,संजय पवार ,तसेच दामाजी कारखान्याचे इतर संचालक मंडळ सदस्य, लक्ष्मण मस्के, बिरा कोळेकर , मंगेश क्षिरसागर, तानाजी मोरे,धनराज लटके, प्रमोद लटके, विकास मोरे, विशाल गावडे, अमोल धोत्रे, पांडूरंग करकंबकर, अमोल राऊत, आकाश नवत्रे, यांचेसह पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध सस्थांचे पदाधिकारी, सरपंच,सदस्य,सोसायटी चेअरमन,सदस्य, कार्यर्ते, पंढरपूर शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या पार पडलेल्या सभेला अलोट जनसमुदाय उपस्थित होता.
या सभेचे सुत्रसंचालन अशोक उन्हाळे,सचिन मळगे,वनिता घाडगे यांनी केले.


test banner