एखादी गोष्ट जेवढी एकजातीय होईल तेवढी त्याची जास्त अधोगती-दिलीप चव्हाण - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

एखादी गोष्ट जेवढी एकजातीय होईल तेवढी त्याची जास्त अधोगती-दिलीप चव्हाण


मंगळवेढा(प्रतिनिधी) सध्या आपण उलट्या दिशेने प्रवास सुरू करतो आहोत आणि ही अतिशय घातक गोष्ट आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून जेवढे बंडखोर लेखक जास्तीतजास्त निपजतील तेवढे आवश्यक आहेत आणि असे शब्दशिवारसारखे अंक ज्यातले लेखक जरी बघितले तरी त्याच्यात संमिश्रता आहे. मी खूप दिवाळी अंक पाहतो. बहुतेक दिवाळी अंक एक जातीय, एक संस्कृतीचे  होत चाललेले मी पाहतो. जितका समाज एकजातीय होईल, एखादी गोष्ट जेवढी एकजातीय होईल तेवढी त्याची अधोगती, त्याचा नायनाट अटळ आहे. त्याला कुणी कधी थांबवू शकत नाही. शब्दशिवारसारखे प्रयोग अत्यंत आवश्यक आहेत. इंद्रजित घुलेंचं मी आभार मानतो की, इतका चांगला अंक तुम्ही आम्हाला दिला. असं संमिश्र राहणं, आपण जंगलाच्या बाबतीत म्हणतो ना की, जेवढी बायोडाव्हर्सिटी त्यात आहे तेवढे जास्त काळ ते टिकतात. अशी डायव्हर्सिटी साहित्यामध्ये संस्कृतीमध्ये आणि जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये आपल्याला दिसायला पाहिजे. त्याचं एक मायक्रो रूप म्हणून मी या शब्दशिवारच्या अंकाकडे बघतोय. असे मनोगत मराठी व इंग्रजी साहित्याचे अभ्यासक दिलीप चव्हाण यांनी शब्दशिवार दिवाळी 2019 च्या प्रकाशनाप्रसंगी कोथरूड येथे व्यक्त केले.
   मंगळवेढ्यासारख्या ग्रामीण भागातून निघत असलेल्या दर्जेदार साहित्याचा अस्सल ठेवा देणार्‍या, मराठीतील उत्कृष्ठ दिवाळी अंकामध्ये आपले स्थान निर्माण करणार्‍या शब्दशिवार या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा दिलीप चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी प्रकाशन सोहळ्यास मराठीतील आघाडीची कसदार अभिनेत्री, कॉमेडी एक्सप्रेसमधील विनोदाची जादू पेरणारी प्राजक्ता हनमघर, ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे, सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक आयएफएस रंगनाथ नाईकडे, सुप्रसिद्ध रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे, लेखिका इंदूमती जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रकाशनाच्या निमित्ताने अभिनेत्री हनमघर म्हणाल्या शब्दशिवार या दिवाळी अंकाचं प्रकाशन करताना खूप छान वाटतंय. मी दरवर्षी एका दिवाळी अंकाचं प्रकाशन करते. पण आज जितका आनंद होतोय, तितका आनंद कधीच झालेला नाही. फार चकचकीत असतं सगळीकडे. मला वाटतं इथं खूप आपली माणसं जमली आहेत. या अंकाच्या प्रकाशनालाही खूप माणुसकीचा ओलावा आहे.
   शब्दशिवारच्या या प्रकाशनासाठी अंकातील लेखक व मान्यवरांची हजेरी होती. यामध्ये डॉ.अलका चिडगोपकर, श्रद्धा चमके, उत्कर्षा सुमित, सुचिता प्रसाद घोरपडे, डॉ.किशोर खिलारे, श्रीरंजन आवटे, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, नूतन वाघ, सायली परांजपे, हजरत काझी, बसवराज पाटील, गणेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते. रिपोर्टर हलिमा कुरेशी यांनी सूत्रसंचालन केले, प्रास्ताविक संपादक इंद्रजित घुले यांनी तर आभार प्रसिद्ध लेखिका इंदूमती जोंधळे यांनी मानले.



test banner