IES परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान पटकावणाऱ्या हर्षल वर कौतुकाचा वर्षाव - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

संवाद न्यूज चॅनेल लवकरच

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१९

IES परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान पटकावणाऱ्या हर्षल वर कौतुकाचा वर्षाव


मराठा सेवा संघ मंगळवेढा सत्कार करताना

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत तांडोर ता. मंगळवेढा येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांक मिळविला.त्याने पहिल्या प्रयत्नात हे यश मिळविले.आयोगाने संकेतस्थळावर नुकताच निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत तांडोर (ता. मंगळवेढा) येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांक पटकावला.

लोकसेवा आयोगातर्फे 2018 मध्ये झालेल्या परीक्षेसाठी जानेवारीत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. उत्तीर्ण  उमेदवारांचा सप्टेंबर- आक्टोंबर महिन्यात मुलाखतींचा टप्पा पार पडला होता. 

हर्षलच्या निवडीने तालुक्यातील तरुणांना प्रेरणा मिळणार हे नक्की. परिस्थितीला न जुमानता आपल्या स्वप्नासाठी अथक प्रयत्न केल्यावर दैदिप्यमान यश हमखास मिळते.

दिवाळीत तालुक्याला मिळालेली ही सर्वात मोठी गोड बातमी दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी आहे

तालुक्यातील मराठा सेवा संघाने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या पुढील देशसेवा कार्यासाठी शुभेच्छा दिल्या