शरद पवारांची परिचारक परिवारावर एका शब्दानेही टिका नाही! सभा फुल्लं पण आमदारांची बत्ती गुल्ल्ं... - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

शरद पवारांची परिचारक परिवारावर एका शब्दानेही टिका नाही! सभा फुल्लं पण आमदारांची बत्ती गुल्ल्ं...

       
                                                         मंगळवेढा(प्रतिनिधी) निवडणूक अंतिम टप्प्यावर आली असताना सर्व स्तरातून भाजपा उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना पाठींबा वाढत असल्याने भारत भालके डेंजर झोन मध्ये असल्याचे स्पष्ट दिसत असताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवारांची सभा भालकेंना तारणारी ठरेल अशा आशेवर भालके समर्थक होते.                                       मात्र आज पंढरीतील शिवतीर्थावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवारांची जाहीर सभा झाली. त्यासभे मध्ये शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात सुधाकरपंत अथवा परिचारक कुटूंबायांवर एका शब्दानेही टिका केली नाही. त्यामुळे भालके समर्थकांची निराशा झाली आहे शरद पवारांची सभा हाच आ.भालकेना अखेरचा आधार वाटत होता. त्यामध्ये पवारांनी शांत राहून परिचारकां वरील प्रेम दाखविले असल्याची चर्चा सुरू झाली आहे मुळात शेवटच्या क्षणापर्यत उमेदवारी साठी भाजपा व सेनेच्या दारात बसलेल्या आ.भालकें विषयी पवार व राष्ट्रवादीचे चांगले मत नाही ज्या पक्षाचे ते विदयमान आमदार आहेत त्या काँग्रेसमध्येही त्यांची विश्वासार्हता संपल्या मुळे व भाजपाने प्रवेश नाकारला व सेनेने उमेदवारी नाकारल्या नंतर त्यांना शरद पवार व राष्ट्रवादीची आठवण झाली त्यामुळे केवळ निवडून येण्यासाठी पवार प्रेम दाखविणा-या भालकेंना राष्ट्रवादीचे नेते चांगले ओळखून आहेत. आ भालके निवडून आलेच ते आपले राहतील याची खात्री कोणीही देऊ शकत नाही म्हणुनच शरद पवार व शिंदेंनी यांच्यासाठी परिचारकांना न दुखावण्याचे ठरविले असावे कपटी व धोकादायक मित्रा पेक्षा दिलदार शत्रु बरा असेच राष्ट्रवादी व काॕग्रेसला वाटत असावे एकुणच पवारांच्या सभेला गर्दी झाली असली तरी त्या सभेचा फायदा आ भालकेंना होण्याची शक्यता वाटत नाही. 
test banner