पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर रासपचाच हक्क.... पण महायुतीचा निर्णयच अंतिम दुग्धविकास मंत्री ना. महादेव जानकर यांचे प्रतिपादन - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १ सप्टेंबर, २०१९

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर रासपचाच हक्क.... पण महायुतीचा निर्णयच अंतिम दुग्धविकास मंत्री ना. महादेव जानकर यांचे प्रतिपादन

 
                                                        मंगळवेढा (प्रतिनिधी): 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही रिडालोसचा प्रयोग केला. आणि पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडला. गत विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाच हा विधानसभा मतदारसंघ सोडला. आता महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना नसल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्षाचा हक्क आहे. पण शेवटी महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णयच अंतिम राहील असे प्रतिपादन राज्याचे दुग्धविकास मंत्री तथा रासपचे संस्थापक अध्यक्ष ना. महादेव जानकर यांनी केले आहे. मंगळवेढा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर महिला प्रदेशाध्यक्षा श्रध्दा भातंबरेकर, राज्य उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, संघटन मंत्री माऊली सलगर,पोपट क्षीरसागर, पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख आबासाहेब मोटे, पंकज देवकते, राज्य प्रवक्ते लक्ष्मण हाके,लोकसभा अध्यक्ष बापूसाहेब मेटकरी, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पै. महेंद्र देवकते, तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, युवक तालुकाध्यक्ष रामभाऊ वाघमोडे, ग्रा.पं. सदस्य सचिन मेटकरी,शहराध्यक्ष नितिन मेटकरी, तालुका संघटक दामाजी मेटकरी आदीजन उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. जानकर म्हणाले, जास्त जागांची मागणी करण्यापेक्षा निवडून येणाऱ्या जागांची मागणी करणे गरजेचे आहे. आज महत्वाच्या निर्णयाच्या वेळी आम्हाला आमचे मत व्यक्त करत असताना पाठीमागे वळून पहावे लागत कारण ज्याच्या मागे जास्त आमदार तसेच लोकप्रतिनिधी असतात त्यांनाच जास्त बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे. मला मंगळवेढा तालुक्याचा भूगोल इतिहास सर्व माहित आहे. या तालुक्याशी माझी जणू नाळच जुळली आहे. वेळोवेळी मी या तालुक्याच्या  प्रश्नांसाठी पाठपुरावा केला आहे.मंगळवेढा तालुक्यास पाणी मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रश्न लावून धरला पाणी देण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. सध्या राज्यात १६ योजना सुरू करून १ हजार कोटीचे बजेट केले आहे. सर्वसामान्य माणसाला याचा लाभ मिळावा म्हणून मी स्वतः प्रयत्न करत आहे.
  धनगर समाजाच्या मुलामुलींसाठी कॉलेज वसतिगृह उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता मराठा समाजाला जसे आरक्षण दिले आहे. तसेच आदिवासींचा आरक्षणाला कसलाही धक्का न लावता धनगरांना आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे.
test banner